खूशखबर ; 19 सप्टेंबरपासून आयपीएलचं बिगुल वाजणार - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

खूशखबर ; 19 सप्टेंबरपासून आयपीएलचं बिगुल वाजणार

मुंबई ः वेबटीम    ‘बीसीसीआय’ने 19 सप्टेंबर ते 8 नोव्हेंबर या कालावधीत आयपीएल 2020 खेळवण्याचे निश्चित केले. आयपीएल 2020 चा 13 वा मौसम यूए...

मुंबई ः वेबटीम 
 ‘बीसीसीआय’ने 19 सप्टेंबर ते 8 नोव्हेंबर या कालावधीत आयपीएल 2020 खेळवण्याचे निश्चित केले. आयपीएल 2020 चा 13 वा मौसम यूएईमध्ये खेळवला जाणार आहे.  आयपीएलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी तारखांची घोषणा केली, मात्र सरकारची मंजुरी प्रलंबित असल्याची माहिती आहे. आयपीएलचं बिगुल 19 सप्टेंबर म्हणजे आजपासून बरोबर 57 दिवसांनी वाजणार आहे. आयपीएलमधील सामने भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 2 वाजता (यूएईच्या स्थानिक वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता) सुरू होण्याची शक्यता आहे. नेहमीप्रमाणे आयपीएलची संपूर्ण टुर्नामेंट रंगणार आहे.  क्रिकेटपटूना कमी थकवा, तर ब्रॉडकास्टरना अधिक कमाईसाठी उपयुक्त असतील, ब्रिजेश पटेल म्हणाले.

“विविध भागधारकांशी सल्लामसलत करुन, आवश्यक त्या सर्व बाबींचा विचार करुन आम्ही हा निर्णय घेतला आहे. आम्हाला सरकारकडून अधिकृत प्रतिसाद मिळाल्यानंतर औपचारिकरित्या प्रशासकीय समिती बोलविली जाईल. पुढच्या आठवड्याच्या सुरुवातीला हे होईल, अशी आम्हाला आशा आहे” असे ब्रिजेश पटेल म्हणाले.
 भारताला कोरोनाचा मोठा फटका बसला असून बहुतांश शहरांना त्यातून सावरण्यासाठी मोठा काळ लागू शकतो, या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने ‘आयपीएल 2020’ भारताबाहेर नेण्याच्या हालचाली सुरु केल्या होत्या.
यूएईमध्ये क्वारंटाईनचे नियम कडक नाहीत, तेथील बाजारपेठा आणि मॉल्स आधीच खुले झाले आहेत. कार्यालयांमध्ये 100 टक्के उपस्थिती आहे आणि पर्यटकांचेही स्वागत केले जात आहे. त्यातच यूएईमध्ये आयपीएल खेळवण्यास विरोध करणाऱ्या जनहित याचिकाही स्थानिक कोर्टात दाखल होण्याची चिन्हं कमी आहेत.
यंदाच्या आशिया चषकाचं आयोजन रद्द करण्यात आल्याची माहिती ‘बीसीसीआय’चे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच दिली होती.
क्रिकेट चाहत्यांमध्ये लोकप्रिय असलेली टी20 लीग ‘आयपीएल 2020’ मार्चपासून सुरु होणार होती, परंतु कोरोना विषाणूच्या साथीमुळे ती अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली होती. मात्र जगभरातील क्रिकेट चाहत्यांचा हा ‘सण’ दोन  महिन्यात भेटीला येत आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत