मुंबई : वेबटीम ऊर्जा खात्यामधील नियुक्त्यांवरुन महाविकास आघाडीत पुन्हा धुसफूस सुरू झाली आहे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थ...
मुंबई : वेबटीम
ऊर्जा खात्यामधील नियुक्त्यांवरुन महाविकास आघाडीत पुन्हा धुसफूस सुरू झाली आहे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीज कंपन्यांवर केलेल्या अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्यांचा फेरविचार केला जाईल असं सांगुण एक प्रकारे आव्हान दिले आहे. यावेळी त्यांनी सरकार तीन पक्षांचं असल्याने सर्वांशी चर्चा करुनच निर्णय घेतला जावा असंही ठामपणे सांगितलं
ऊर्जा खात्यामधील नियुक्त्यावरून खदखद : ऊर्जा खात्यातील नियुक्त्या करताना तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन नियुक्त्त्या झाल्या पाहिजेत. आमच्यात कोणतीही नाराजी नाही. काही गोष्टी घडत असतात. काही विषय असतील तर आम्ही दुरुस्ती करत असतो. पण याला नाराजी म्हणणं योग्य नाही,असं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं. राष्ट्रवादीच्या सारथीवर काँग्रेसचा डोळा: राष्ट्रवादीचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आवडीचे सारथी आता काँग्रेसला हवंय, सारथी काँग्रेसकडे असावे, असे मुख्यमंत्र्यांना याबाबत कळवण्यात आलं आहे अशी माहिती थोरात यांनी दिली. निधी वाटपात मतभेद : ₹आमदारांना निधी वाटप करताना सर्वांना समान न्याय मिळावा. सर्व आमदारांना समान लेखून केलं पाहिजे हे आमचं म्हणणं आहे. सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजे. सरकार चालवताना या गोष्टी होत असतात. चर्चा केली जाते, धोरणं ठरवली जातात. काही समस्या आल्या तर त्यातून मार्ग काढत असतो,” असं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं आहे. दरम्यान परस्पर केलेल्या नियुक्त्यांवरील वादानंतर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीज कंपन्यांवर केलेल्या अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत