उंबरे : वेबटीम राहुरी तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या 50 पेक्षा अधिक झाली आहे, याचा पादुर्भाव ग्रामीण भागात देखील सुरू असून उंबरे ...
उंबरे : वेबटीम
राहुरी तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या 50 पेक्षा अधिक झाली आहे, याचा पादुर्भाव ग्रामीण भागात देखील सुरू असून उंबरे ग्रामस्थानी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सुरक्षितता म्हणून कडक सामाजिक आचारसंहिता जारी केली आहे.
राहुरी तालुक्यातील 15 पेक्षा अधिक गावात आतापर्यंत कोरोनाचे रुग्ण सापडले आहे, यात अधिकारी, कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय लोकं, महिला आदी बाधित झालेले आहेत, राहुरी तालुक्यात वाढत असलेला हा प्रसार पाहता उंबरे येथे प्रशासनाने कडक पाऊले उचलली आहेत, त्यानुसार गावात लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय होणार आहे, तसे संकेत प्रशासनाने दिले आहेत, तलाठी अधिकारी अंकुश सोनार व ग्रामसेवक शेख भाऊसाहेब गावतील परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत, ग्रामस्थांनी परिस्थितीचे भान ठेवून मास्कचा वापर करावा, शक्यतो, घराबाहेर पडू नये, विनाकारण रस्त्यावर, चौकात एकत्र जमू नये, आशा सूचना करण्यात येत आहेत, सामाजिक कार्यकर्ते आप्पासाहेब ढोकणे यांनी गावात दक्षतेबाबत घ्यावयाची काळजी आणि सूचना दिल्या आहेत, गावचे सरपंच राजेंद्र ढोकणे, पोलीस पाटील गोरक्षनाथ देव्हारे गावातील उपाययोजना करताना दिसत आहे, तसेच हा आजार गंभीर नाही, यातून रिकव्हरीचे प्रमाण अधिक आहे, त्यामुळे याचा धसका घेऊ नका, मात्र काळजी घेणे तितकेच गरजेचे आहे, अन्यथा गावात उद्रेक होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत