देवळाली प्रवरा : वेबटीम विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेले ‘राजगृहा’वर हल्ला करून तोडफोड करणाऱ्या व्यक्...
देवळाली प्रवरा : वेबटीम
*गिडेगाव प्रकरणी आरोपीला अटक करा*
नेवासा तालुक्यातील गिडेगाव येथील ११ वर्षीय दलित समाजाच्या मुलीवर धारदार शस्त्राने वार केल्याची घटना घडली असून याप्रकरणी गँभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करावी अशी मागणी जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात व नेवासा तालुकाध्यक्ष सुशील धायजे यांनी यावेळी केली.
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेले ‘राजगृहा’वर हल्ला करून तोडफोड करणाऱ्या व्यक्तींना तात्काळ अटक करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आरपीआय उत्तर नगर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी केली आहे.यावेळी सुरेंद्र थोरात यांनी म्हंटले की, राजगृह’ हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईच्या दादरमधल्या हिंदू कॉलनी परिसरातील निवासस्थानी आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते.जगभरातील आंबेडकर अनुयायी येथे दररोज भेटीला येत असतात.आंबेडकर अनुयायांसाठी हे महत्त्वाचे ठिकाण मानले जाते. मात्र काही माथेफिरुनी घराचे व बागेचे आणि घराबाहेरील नुकसान केले ही अतिशय निंदनीय बाब असून आरपीआयवतीने या हल्ले खोरांचा वृत्तीचा निषेध करून या प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाई न केल्यास जिल्हाभर आरपीआयच्यावतीने आंदोलन छेडु असा इशारा सुरेंद्र थोरात यांनी दिला आहे. त्याच पिंपरी चिंचवड येथील विराज जगताप व नागपूर येथील अरविंद बनसोड हत्या प्रकरणाची कसून चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी थोरात यांनी केली.
*गिडेगाव प्रकरणी आरोपीला अटक करा*
नेवासा तालुक्यातील गिडेगाव येथील ११ वर्षीय दलित समाजाच्या मुलीवर धारदार शस्त्राने वार केल्याची घटना घडली असून याप्रकरणी गँभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करावी अशी मागणी जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात व नेवासा तालुकाध्यक्ष सुशील धायजे यांनी यावेळी केली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत