आज बुधवार दि 8 जुलै ; वाचा काय सांगतेय आपली रास - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

आज बुधवार दि 8 जुलै ; वाचा काय सांगतेय आपली रास

मेष : आर्थिक विवंचना सुटतील. घरातील ज्येष्ठांच्या सल्ल्यानुसार वागल्यास नुकसान कमी होईल. वेळ हे सर्व जखमांवरचे औषध आहे. व्यापारात झालेल्य...

मेष : आर्थिक विवंचना सुटतील. घरातील ज्येष्ठांच्या सल्ल्यानुसार वागल्यास नुकसान कमी होईल. वेळ हे सर्व जखमांवरचे औषध आहे. व्यापारात झालेल्या फायद्यामुळे आनंदाचा गुणाकार होईल. वैवाहिक जीवन उत्तम राहील. विद्यार्थ्यांना उत्साहवर्धक दिवस. एखादी महत्त्वाची माहिती मिळू शकते. नियोजित कामे पूर्ण झाल्याने मन प्रसन्न राहील.
वृषभ : नवीन प्रकल्प राबविण्यासाठी उत्तम दिवस. व्यवसायानिमित्त प्रवास करावा लागेल. धनलाभ होईल. आश्चर्यकारक घटना घडतील. मानसिक समाधान आणि शांतता लाभेल. बहुप्रतिक्षित यशामुळे दिवस आनंदात जाईल. दिवसाचा उत्तरार्ध हास्य-विनोदात जाईल. भाग्य पूर्ण साथ देईल.
मिथुन : कौटुंबिक समस्या सोडविण्यात यशस्वी व्हाल. संततीसाठी एखादी भेटवस्तू खरेदी कराल. जोडीदाराबरोबर सुखाचे क्षण अनुभवाल. हाती घेतलेली कामे सुलभतेने पार पडतील. वेळेचा अपव्यय टाळावा. अनावश्यक खर्चांवर नियंत्रण गरजेचे. कायदेशीर कागत्रपत्रे पडताळून घेणे हिताचे ठरेल.

कर्क : नवीन ओळखीतून आर्थिक लाभ होण्याची शक्यता. कलाक्षेत्रातील मंडळींसाठी काळ चांगला. नवीन संकल्पना यशस्वी होतील. पराक्रमात वाढ होईल. सर्वार्थाने अनुकूल दिवस. विजयप्राप्तीचा आनंद होईल. दिवसाचा उत्तरार्ध मनोरंजनात छान जाईल. मानसिक शांतता लाभेल.
सिंह : आज मित्राचा सल्ला लाभदायक ठरेल. कामकाजाच्या पद्धतीत केलेले महत्त्वाचे बदल यश देतील. जोडीदाराची साथ मिळेल. नवीन संकल्पना सुचतील. आशावादी राहा. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. नोकरदार वर्गाला नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. मन प्रसन्न राहील.
कन्या : परिवारातील इतर सदस्यांमुळे ताण वाढण्याची शक्यता. जबाबदाऱ्या पार पडाताना जीव मेटाकुटीला येईल. नोकरीत प्रशंसा होईल. दिनक्रम व्यस्त राहील. गोड बोलून कामे करून घ्यावीत. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. समस्यांतून बाहेर पडण्याचा मार्ग सापडेल. आदर, आपुलकी कायम ठेवा.
तुळ : घरातील डागडुजीची कामे पूर्ण कराल. व्यावसायिकांनी विरोधकांना कृतीतून चोख उत्तर द्यावे. उत्तरार्धात एकांत हवासा वाटेल. कोणताही निर्णय घाईगडबडीत घेऊ नका. वैयक्तिक मतभेद दूर सारून व्यवसायात लक्ष केंद्रीत करावे. जिभेवर ताबा ठेवावा. अन्यथा मन खिन्न होऊ शकते.
वृश्चिक : कौटुंबिक जबाबदारीचे ओझे वाटणार नाही. आनंदाने कार्यरत राहाल. करिअरविषयी दृष्टिकोन स्पष्ट असेल. लोकप्रियतेत भर पडेल. नवीन ओळखी लाभदायक ठरू शकतात. विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासावर भर देणे फायद्याचे ठरेल. दिवसाचा उत्तरार्ध उत्तम जाईल. आध्यात्मिक आवड वाढेल. धार्मिक कार्यात सक्रिय सहभाग घ्याल.
धनु : संततीचे समंजसपणाने वागणे चकीत करेल. तुमच्या खेळकर वृत्तीमुळे आजूबाजूचे वातावरण आनंदी राहील. नोकरीत बढतीचे योग. राजकीय मदत मिळण्याचे योग. मात्र, बोलण्यावर ताबा ठेवायला हवा. वाहन चालवताना काळजी घ्यावी. मन प्रसन्न राहील.
मकर : आर्थिक तोटा होण्याची शक्यता. महत्त्वाचे व्यवहार करताना सतर्क राहा. नोकरदारांसाठी नवीन योजना अमलात येतील. यश, प्रगतीचे मार्ग प्रशस्त होतील. प्रवास लाभदायक ठरू शकतात. धनलाभाचे योग आहेत. मान, सन्मान वाढेल.
कुंभ : आर्थिक गुंतवणूक करताना सल्ला घेणे आवश्यक. कुटुंबात मन रमेल. उत्तरार्धात चित्रकलेत मन रमेल. उत्तम कार्यशैली आणि मृदू व्यवहारामुळे लाभ मिळतील. दुसऱ्यांची मदत घेण्यास यशस्वी व्हाल. प्रवास पुढे ढकल्याचा लाभ होईल.
मीन : सकारात्मक विचारसरणीचा फायदा होईल. मानसिक ताण कमी होईल. विश्वासाने कार्य करीत रहिल्यास उद्दिष्ट नक्की गाठू शकता. दिवसाची सुरुवात धावपळीने होईल. धार्मिक कार्यात सक्रिय सहभाग घ्याल. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक होईल. दिनक्रम व्यस्त राहिल्याने थकवा जाणवेल. जोडीदाराचा उत्तम सहवास लाभेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत