अरे बापरे, अंत्यसंस्कारानंतरही माणूस जिवंत ..! ; वाचा काय नेमका प्रकार - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

अरे बापरे, अंत्यसंस्कारानंतरही माणूस जिवंत ..! ; वाचा काय नेमका प्रकार

मुंबई : वेबटीम  ठाण्यातील कोपरी, सिद्धार्थ नगर येथील एका ६७ वर्षीय व्यक्तीचे कोविड रुग्णालयात ३ जुलै रोजी निधन झाल्याचे त्यांच्या नातेव...

मुंबई : वेबटीम 
ठाण्यातील कोपरी, सिद्धार्थ नगर येथील एका ६७ वर्षीय व्यक्तीचे कोविड रुग्णालयात ३ जुलै रोजी निधन झाल्याचे त्यांच्या नातेवाईकांना कळवण्यात आले. रुग्णालय प्रशासनाकडून पूर्णपणे बंदिस्त बॅगमध्ये मृतदेह अंत्यसंस्कारासाठी सुपूर्द करण्यात आला. मृतदेहावर रुग्णाचे नाव, माहिती चिकटवण्यात आली होती. त्यानुसार त्या मृतदेहावर अंत्यसंस्कारही करण्यात आले. परंतु ६ जुलै रोजी या कुटुंबाशी संपर्क साधून त्यांचा नातेवाईक रुग्णालयात अतिदक्षता विभागात असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे तीन दिवसांपूर्वी अंत्यसंस्कार नेमके कोणावर केले, असा प्रश्न या कुटुंबाला पडला. या कुटुंबाने कापूरबावडी पोलिसांना याबाबत कळवले. दरम्यान, रुग्णालय प्रशासनाने या कुटुंबाची त्यांच्या रुग्णाची भेट घडवली तसेच कोणत्याही प्रकारची तक्रार नसल्याचे लिहूनही घेण्यात आले.
या पार्श्वभूमीवर, हा मृतदेह ३ जुलैपासून बेपत्ता असलेल्या रुग्णाचा असल्याचा आरोप भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी केला आहे. मृतदेहाच्या बॅग पारदर्शक नसल्याने चेहराही पाहण्याची सोय नसल्याने नातेवाइकांच्या भावनांशी खेळ केला जात असल्याचे ट्वीट डावखरे यांनी केले. आमदार संजय केळकर यांनीही याबाबत तीव्र संताप व्यक्त करत दोषींवर तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. बेपत्ता रुग्णाच्या कुटुंबियांना दोन दिवसांपासून प्रचंड मनस्ताप होत असून प्रशासनाचा हा निष्काळजीपणा आणि चूक दडपण्याचा प्रकार धक्कादायक असल्याची तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत