राहुरी : वेबटीम शहरासह तालुक्यात शुक्रवारी रात्री ढगफुटीसदृश मुसळधार पाऊस कोसळला. पावसाने ओढ्या नाल्यांना अक्षरश: पूर आला होता. अनेक ठि...
राहुरी : वेबटीम
शहरासह तालुक्यात शुक्रवारी रात्री ढगफुटीसदृश मुसळधार पाऊस कोसळला. पावसाने ओढ्या नाल्यांना अक्षरश: पूर आला होता. अनेक ठिकाणी रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले होते. पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यातील ब्राम्हणी मंडल विभागामध्ये सुमारे 105 मिलीमीटरच्या आसपास पाऊस नोंदविला गेला.
राहुरी तालुक्यात काल दिवसभर काहीशी विश्रांती घेऊन सर्वदूर पाऊस कोसळत होता. तालुकतातील ब्राम्हणी मंडलातील उंबरेसह काही गावात नेहमीप्रमाणेच काल दुपारीही पाऊस झाला होता. त्यानंतर तालुकाच्या अन्य भागातही जोरदार पावसाने हजेरी लावली, मात्र हा पाऊस थांबल्यानंतर रात्री पुन्हा मुसळधार पावसाने शेतकऱ्यांची झोप उडवली. ब्राम्हणी, उंबरे परिसरात जोरदार पाऊस झाला. या पावसाने सर्व पिके पाण्याखाली गेल्याने शेतकºयांचे नुकसान झाले आहे. अन्य गावात देखील रात्री खूप पाऊस झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ शेतकऱ्यांच्या कपाशी, सोयाबीन व अन्य नुकसानीची पंचनामे करावीत, अशी मागणी छत्रपती प्रतिष्ठान, डॉ राम ढोकणे फौंडेशन व भाजपा पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
दरम्यान, उंबरे गावात अनेक घरात पावसाचे पाणी घुसले आहे. जुने बसस्थानक परिसरातील शिवा वैरागर यांच्या घरात पाणी गेल्याने या कुटुंबाने अक्षरशः रात्र जागून काढली, तसेच परिसरातील योगेश ढोकणे, सतपाल गायकवाड, बाबू ढोकणे, भाऊराव गायकवाड, पोपट दुशिंग आदी कुटुंबाला पावसाच्या पाण्याची विल्हेवाट नसल्याने त्रासाला सामोरे जावे लागत असून ग्रामपंचायतीने उपाय योजना करण्याची मागणी होत आहे



कोणत्याही टिप्पण्या नाहीत