पीकविमा भरण्यास 5 ऑगस्ट पर्यंत मुदत वाढ द्यावी! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

पीकविमा भरण्यास 5 ऑगस्ट पर्यंत मुदत वाढ द्यावी!

अहमदनगर : वेबटीम     तांत्रिक अडचणीमुळे अनेक शेतकरी आपल्या पिकांचा विमा काढू शकलेले नाहीत, त्यामुळे पीकविमा भरण्यासाठी केंद्र शासनाने अजून म...

अहमदनगर : वेबटीम 
 
 तांत्रिक अडचणीमुळे अनेक शेतकरी आपल्या पिकांचा विमा काढू शकलेले नाहीत, त्यामुळे पीकविमा भरण्यासाठी केंद्र शासनाने अजून मुदतवाढ देऊन  5 ऑगस्ट पर्यंत शेतकऱ्यांना पीकविमा काढण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी छत्रपती प्रतिष्ठाJनच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.
 राज्यासह देशातील शेतकऱ्यांसाठी हवामान आधारित पीक विमा योजना सरकारने लागू केली आहे. त्या धर्तीवर यंदाच्या खरीप पिंकांचा विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांना 31 जुलै अंतिम मुदत देण्यात आली होती, त्यानुसार अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन, बाजरी, कपाशी व अन्य पिकांचे विमे उतरवले आहेत, मात्र शेवटच्या दोन तीन दिवस सर्व्हर डाऊन असल्याने अनेक शेतकरी आपल्या पिकांचा विमा उतरवू शकले नाही, तंत्रिक कारणामुळे , वंचीत राहू नये यासाठी सरकारने पीकविमा भरण्याची मुदत वाढवावी, अशी मागणी अनेक संघटना, लोकप्रतिनिधी यांनी केली, किमान 5 दिवस ही मुदत वाढवावी, अशी मागणी छत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत