राहुरी : वेबटीम राहुरी तालुक्यात गेल्या दोन आठवड्यापासून दररोज पाऊस सुरू आहे, या अतिवृष्टीने खरीप पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. ...
राहुरी : वेबटीम
अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यामध्ये उंबरे, ब्राम्हणी, वांबोरी, बारागाव नांदूर, सोंनगाव, गुहा, देवळाली, टाकलिमिया, वळण आदींसह सर्वच भागात सध्या पावसाने थैमान घातले आहे. दररोज पडणाऱ्या अतिवृष्टीने शेतात पाणी साचल्याने कपाशी, सोयाबीन व चारा आदी विविध पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
राहुरी तालुक्यात गेल्या दोन आठवड्यापासून दररोज पाऊस सुरू आहे, या अतिवृष्टीने खरीप पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून शासनाने एकरी 50 हजाराची मदत घ्यावी, अशी मागणी छत्रपती प्रतिष्ठान व डॉ राम ढोकणे फौंडेशनच्या वतीने डॉ रामकीसन ढोकणे व सचिन शेजुळ यांनी केली आहे. दरम्यान, लवकरच मुख्यमंत्री महोदयाना याविषयी निवेदन पाठविण्यात येणार आहे.
वास्तविकता, शेतकऱ्यांनी उसनवारी, सावकारी काढून खरिपाची पिके घेतली आहेत, महागडी बियाणे, खते, औषधे खर्च करून पेरण्या केल्या, मात्र गेल्या 15 दिवसापासून दररोज पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांच्या स्वप्नांवरच जणू पाणी फिरले आहे, कपाशी, सोयाबीन पाण्यात बुडल्याने सडली आहे, चारापीके भुई सपाट झाली आहेत, त्यामुळे शेतकरी ओल्या संकटाने मेटाकुटीस आला आहे, खरीप हंगाम हातातून गेला आहे, त्यामुळे झालेल्या कपाशी, सोयाबीन, चारा आदी पिकांसह सर्व शेती पिकांचे तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी 50 हजारांची मदत मिळणे कामी संबंधित विभागाला तात्काळ योग्य ते आदेश द्यावेत, अशी मागणी युवानेते गोरक्षनाथ सुदाम ढोकणे, राहुल पाटील, विलासराव गरुड, संदीप ढोकणे, गणेश अलावणे, आकाश साबळे, दत्ता पवार, कैलास खंडागळे, गणेश दुशिंग, एकनाथ महाराज वाघ आदींनी केली आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत