जिल्ह्यात 24 तासात ब्राम्हणीसह 428 रुग्ण ; रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 70 टक्के - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

जिल्ह्यात 24 तासात ब्राम्हणीसह 428 रुग्ण ; रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 70 टक्के

अहमदनगर : वेबटीम  जिल्ह्यात काल (बुधवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४२८ ने वाढ झाली. यामध्ये जिल्...

अहमदनगर : वेबटीम 
जिल्ह्यात काल (बुधवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४२८ ने वाढ झाली. यामध्ये जिल्हा रुग्णालय कोरोना टेस्ट लॅबमध्ये ५४, अँटीजेन चाचणीत १२६ आणि खाजगी प्रयोगशाळेत बाधीत आढळून आलेल्या २४८ रुग्णांचा समावेश आहे. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १६०४ इतकी झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात आज २२८ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रूग्णांची संख्या आता २९४९ इतकी झाली. रूग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ६९.८० टक्के इतके आहे.
दरम्यान काल सायंकाळपासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत जिल्ह्यात ४० रूग्ण आढळले होते. त्यानंतर या संख्येत आणखी १४ रुग्णांची भर पडली. यामध्ये, संगमनेर ०६- निमोण ५, जोर्वे १, श्रीगोंदा ०१- पिंपळगाव पिसा , नगर ग्रामीण ०१- चास, अहमदनगर शहर -०३ - सारस नगर ०३, पाथर्डी ०२- पाथर्डी शहर ०१, पागोरी पिंपळगाव ०१, नेवासा -०१- तरवडी ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत