तुम्ही एम्प्लॉयमेंट कार्यालयात नाव नोंदलले असेल तर,वाचा काय आहे सूचना - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

तुम्ही एम्प्लॉयमेंट कार्यालयात नाव नोंदलले असेल तर,वाचा काय आहे सूचना

अहमदनगर : वेबटीम     जिल्हयातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींनी जिल्हा कौशल्य विभागाकडे केलेल्या नाव नोंदणीचा डाटा 15 ऑगस्ट पर्यंत अपडे...


अहमदनगर : वेबटीम    
जिल्हयातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींनी जिल्हा कौशल्य विभागाकडे केलेल्या नाव नोंदणीचा डाटा 15 ऑगस्ट पर्यंत अपडेट करावा, असे आवाहन सहायक आयुक्त यांनी केले आहे
 जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाकडे नोंदणी केलेल्या उमेदवारांच्या नावनोंदणीचा डाटा दिनांक 15 ऑगस्ट, 2020पर्यंत www.mahaswayam.gov.in  या वेबसाईटवर अपडेट करण्यात यावा. त्यांचा नोंदणीचा डाटामध्ये मोबाईल नंबर, ई-मेल आयडी, आधार नंबर व त्यांच्या नोंदणी अभिलेख्यामध्ये उदा. स्पेशल विषय, अनुभवाची नोंद इ. माहिती अद्यावत करण्यात यावी.अन्यथा सदर उमेदवारांची नोंदणी 15 ऑगस्ट, 2020 नंतर रद्द झाल्यास त्याची जबाबदारी संबंधितांची राहील याची नोंद घ्यावी, असे आवाहन  वि. जा. मुकणे, सहायक आयुक्त,कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता ,अहमदनगर यांनी केले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत