ऐकावे ते नवल..! पोलिसाच्या घरी चोरी ..! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

ऐकावे ते नवल..! पोलिसाच्या घरी चोरी ..!

राहुरी :वेबटीम   दोन दिवसांपूर्वी पोलिसांच्या नाकावर टिच्चून चोरट्याने पोलीस स्टेशन आवारातून वाळूचे वाहन पकडल्याची घटना ताजी असताना आज ...

राहुरी :वेबटीम
 दोन दिवसांपूर्वी पोलिसांच्या नाकावर टिच्चून चोरट्याने पोलीस स्टेशन आवारातून वाळूचे वाहन पकडल्याची घटना ताजी असताना आज या चोरट्याने एका पोलिसाच्या घरात हात साफ केल्याने खळबळ उडाली आहे. 
राहुरी शहरात आज (सोमवारी) पहाटे तीन वाजता बिरोबानगर येथे दाट लोकवस्तीत भाडोत्री घरात राहणारे राहुरी पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक वैभव साळवे यांच्या घरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला.
काल साळवे कुटुंब सोनई येथे जवळच्या नातेवाईकाच्या दशक्रिया विधीसाठी गेले होते. तेथे ते मुक्कामी राहिले. चोरट्यांनी बंद घराच्या मागील बाजूने असलेल्या स्वयंपाक घराचा दरवाजा फोडून प्रवेश केला. बेडरूममधील सामानाची उचकापाचक केली.
लोखंडी कपाटातील वीस हजार रुपये व लाकडी कपाटातील सोन्या-चांदीचे 40 हजार रुपये किमतीचे दागिने असा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला.
छाया वैभव साळवे (वय 36, रा. बिरोबानगर, राहुरी) यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बागूल यांनी घटनास्थळी पाहणी केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत