अबब..! जिल्ह्यात आज 41 रुग्ण ; संगमनेरात कोरोनाचा महापूर, कुरणला 23 जणांना लागण - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

अबब..! जिल्ह्यात आज 41 रुग्ण ; संगमनेरात कोरोनाचा महापूर, कुरणला 23 जणांना लागण

  अहमदनगर  ; वेबटीम  जिल्ह्यात आज ०५ जुलै २०२० रोजी दुपारी कोरोनाचे १३ रुग्ण आढळले होते. त्यानंतर पुन्हा रात्री  ८-१५ वा. आणखी २८ रुग्ण...

 अहमदनगर  ; वेबटीम 
जिल्ह्यात आज ०५ जुलै २०२० रोजी दुपारी कोरोनाचे १३ रुग्ण आढळले होते. त्यानंतर पुन्हा रात्री  ८-१५ वा. आणखी २८ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आज रविवार ५ जुलै रोजी दिवसभरात ४१ रुग्ण आढळले आहे. यामध्ये संगमनेर तालुक्यातील कुरण येथील २२ जण बाधित आढळून आले आहेत. याशिवाय श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील ०५ जण बाधित आढळून आले आहेत. तर निंबे नांदूर (ता. शेवगाव) येथील ०१ रुग्ण कोरोना बाधित आढळला आहे.  संगमनेर तालुक्यातील कुरण येथे तब्बल 22 व्यक्तींचा रिपोर्ट कोरोना बाधित असल्याचे मिळून आला आहे. त्यामुळे तेथे कोरोनाने थैमान घातल्याचे आता दिसून येत आहे. यापुर्वी तेथे पहिल्यांदा दोन रुग्ण मिळून आले होते. त्यानंतर थेट एका कोरोना बाधित रूग्णाचा मृत्यू झाला तर त्यानंतर एक संशयित असतानाच खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला होता. त्यानंतर कुरण हे कोरोनाचे केंद्र बनले. एकवेळी शहरात एकही रूग्ण मिळत नाही. मात्र, प्रत्येक अहवालात कुरण येथील एक का होईना रूग्ण मिळून येत होता. विशेष म्हणजे अगदी कालच येथे सहा रुग्ण कोरोना बाधित मिळून आले होते. मात्र, आज कोरोनाते तेथे अक्षरश: थैमान घातले असून आज चक्क 22 व्यक्ती कोरोना बाधित मिळून आल्या आहेत. त्यामुळे अनेकांनी तोंडात बोट घातले आहे. तर या रिपोर्टनंतर आज एकाच दिवसात 23 रुग्ण कोरोनाचे मिळून आले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत