राहुरी : वेबटीम। मुळा धरण पाणलोटात सुरू असलेल्या पावसामुळे आता धरणाच्या दिशेने सुरू होणारी आवक वाढल्याचे चित्र आहे. काल सायंकाळी 6 वाज...
राहुरी : वेबटीम।
मुळा धरण पाणलोटात सुरू असलेल्या पावसामुळे आता धरणाच्या दिशेने सुरू होणारी आवक वाढल्याचे चित्र आहे. काल सायंकाळी 6 वाजता मुळा नदीपात्रातून धरणाकडे 1673 क्यसुेकने आवक सुरू होती. तर धरणाचा पाणीसाठा 8 टिएमसीच्या दिशेने वाढता होता.नगर दक्षिण जिल्ह्यासाठी वरदान समजल्या जाणार्या मुळा धरणाकडे शेतकर्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. मात्र, काही दिवसांपासून लाभक्षेत्रात पाऊस सुरू असला तरी पाणलोटात मात्र वरूणराजा रुसला होता. परंतु आता गेल्या तीन चार दिवसांपासून पाणलोटातील अकोले परिसरात पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे मुळा नदीवरील पिंपळगाव खांड धरण भरून पाणी मुळा धरणाच्या दिशेने झेपावले आहे. काल सायंकाळी हेच पाणी 1673 क्युसेकने सुरू होते. त्यामुळे धरणात 7900 दलघफू पाणीसाठा झाला होता. धरणातील आवक वाढल्याने शेतकर्यांच्या आशा उंचावल्या आहेत

कोणत्याही टिप्पण्या नाहीत