हॉटेल, रेस्टॉरंट सुरू करण्याच्या हालचाली ; मुख्यमंत्री अनुकूल - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

हॉटेल, रेस्टॉरंट सुरू करण्याच्या हालचाली ; मुख्यमंत्री अनुकूल

 स्वयंशिस्तीसाठी स्वत:ला नियम घाला: आदित्य  राज्यातील हॉटेल्स आणि रेस्टॉरंट सुरू करण्याचा विचार आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांननी...

 स्वयंशिस्तीसाठी स्वत:ला नियम घाला: आदित्य 

राज्यातील हॉटेल्स आणि रेस्टॉरंट सुरू करण्याचा विचार आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांननी आज स्पष्ट केलं.
मुख्यमंत्र्यांनी आज राज्यातील हॉटेल्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधून हे संकेत दिले. पर्यटन व्यवसायातील महत्वाचा उद्योग असलेली हॉटेल्स तसेच लॉजेस सुरु करण्यापूर्वी खूप काळजी घेऊन परवानगी द्यावी लागेल. आपली जबाबदारी दुहेरी आहे. हॉटेल्समध्ये येणारा प्रत्येक अभ्यागत, प्रवाशी निरोगी असेल यासाठी त्यांची वैद्यकीय तपासणी करावी लागेल. कारण एक कोविड पॉझिटिव्ह व्यक्ती हॉटेलमध्ये आला तरी सर्व हॉटेल व कर्मचारी आजारी पडू शकतात. आत्ता आत्ता आपण सलूनला परवानगी दिली आहे, ती सुद्धा फक्त केस कापणे व हेअर डायसाठी. जिम देखील बंदच ठेवले आहे कारण आपल्याला खूप काळजी घ्यावी लागणार आहे. हॉटेल्स सुरू करायला काही अडचण नाही. मात्र राज्य शासनाने आखून दिलेल्या कार्यपद्धतीप्रमाणे आपल्याला नियमांचे पालन करावे लागणार आहे, असं सांगतानाच आज जे स्थानिक कामगार, कर्मचारी आपल्या हॉटेल्समध्ये आहेत त्यांना काढू नका. यात आपण काहीतरी मार्ग निश्चितपणे काढू, या संकट समयी कामगार संघटना देखील अवाजवी मागण्या करणार नाहीत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. यावेळी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, पर्यटन प्रधान सचिव वल्सा नायर सिंह सहभागी होते.

 हॉटेल उद्योग हा पर्यटन व्यवसायासाठी खूप महत्वाचा आहे. नाईट लाईफला देखील आपण प्रोत्साहन दिले. मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद व इतर मोठ्या शहरांत आम्ही सगळे व्यवहार सुरू करतांना भविष्यातील वाढती रुग्ण संख्या लक्षात घेऊन जम्बो सुविधा वाढवण्यावर भर दिला आहे. या सगळ्या प्रयत्नांत हॉटेल्सनी आमच्या वैद्यकीय तसेच शासकीय यंत्रणांसाठी खूप मदत केली. करोनानंतर हा हॉटेल उद्योग परत जोमाने पायावर उभा राहिला पाहिजे. मात्र करोनाच्या पार्श्वभूमीवर या उद्योगाने स्वयंशिस्तीसाठी स्वत:ला नियम घालणे महत्वाचे आहे, असं पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितलं

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत