सरपंच व ग्रामसेवकाने खाल्लं गटार ; वाचा कुठं घडला हा प्रकार - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

सरपंच व ग्रामसेवकाने खाल्लं गटार ; वाचा कुठं घडला हा प्रकार

मुंबई ः वेबटीम तासगाव तालुक्यातील कवठेएकंदच्या सरपंच ज्योती दीपक गुरव (वय ३०, रा. कवठेएकंद) आणि ग्रामसेवक चंद्रकांत तातोबा राजमाने (वय ५...

मुंबई ः वेबटीम
तासगाव तालुक्यातील कवठेएकंदच्या सरपंच ज्योती दीपक गुरव (वय ३०, रा. कवठेएकंद) आणि ग्रामसेवक चंद्रकांत तातोबा राजमाने (वय ५३, रा. तासगाव) या दोघांवर चार लाख ३० हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या दोघांनी गावात गटाराचे काम केल्याची खोटी माहिती देऊन जिल्हा परिषदेची फसवणूक केली आहे.
 सरपंच गुरव आणि ग्रामसेवक राजमाने यांनी पदाचा गैरवापर करीत गावात गटाराचे बांधकाम केल्याचे कागदोपत्री दाखवले. यासाठी मजुरांची खोटी नावे दाखवून त्यांचे हजेरीपत्रक तयार केले. कंत्राटदार दत्तकुमार रावसाहेब माळी (रा. मालगाव) यांच्याद्वारे काम केल्याचे दाखवले. या कामासाठी लागणारी चार लाख ३० हजार रुपयांची रक्कम त्यांनी जिल्हा परिषदेकडून घेतली. प्रत्यक्षात मात्र कोणतेच काम झाले नसल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांनी चौकशीचे आदेश दिले होते. चौकशीत गैरप्रकार उघडकीस आल्याने तासगाव पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी दीपा बापट यांनी तासगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत