पारनेरमध्ये राजकीय भूकंप ; शिवसेनेला खिंडार, राष्ट्रवादीत अनेकांचा प्रवेश - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

पारनेरमध्ये राजकीय भूकंप ; शिवसेनेला खिंडार, राष्ट्रवादीत अनेकांचा प्रवेश

अहमदनगर : वेबटीम     आज बारामती येथे राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे ...

अहमदनगर : वेबटीम
   
आज बारामती येथे राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे तालुक्यातील पदाधिकारी व पारनेर नगरपंचायतीच्या अनेक नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यामुळे विधानसभेचे माजी उपाध्यक्ष व माजी आ. विजय औटी यांच्या स्थानिक राजकारणाला जबरदस्त धक्का बसला आहे.
    पारनेरमध्ये काही दिवसांपासुन ज्या राजकीय भूकंपाची दबक्या आवाजात चर्चा सुरू होती तिला आज अखेर पुर्ण विराम मिळाला. पारनेरचे आ. निलेश लंके यांनी माजी आ. विजयराव औटी यांच्या पारनेरमधील गडाला हादरा दिल्याने एकाच वेळी अनेक बुरुंज ढासळले आहेत.     शिवसेनेच्या महिला आघाडी तालुकाप्रमुख उमाताई बोरुडे यांच्यासह डॉ. मुद्दस्सीर सय्यद, नंदकुमार देशमुख, किसन गंधाडे, वैशाली आनंदा औटी, नंदा देशमाने हे पाच नगरसेवक त्याचप्रमाणे उद्योजक सहदेव तराळ, शैलेश औटी, संतोष गंधाडे, राजेश चेडे हयांच्यासह शेकडो शिवसैनिक देखील राष्ट्रवादीमय झाले. शिवसेनेतून राष्ट्रवादीत दाखल झालेले सर्वच पदाधिकारी व नगरसेवक हे माजी आमदार विजयराव औटी यांचे कट्टर व एकनिष्ठ कार्यकर्ते होते.
आ. निलेश लंके यांची विधानसभा निवडणुकीनंतर पारनेर तालुक्याच्या राजकारणातील पकड आणखी घट्ट झाली असून येणार्‍या भविष्य काळात तालुक्यातील अनेक विरोधक आ. लंके यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीत आल्यास नवल वाटू नये. आजच्या राजकीय खेळीतून आमदार निलेश लंके यांचे अष्टपैलू नेतृत्व दिसून आले आहे. पारनेर नगरपंचायतीची पंचवार्षिक मुदत चार महिन्यात संपणार आहे. पारनेर नगरपंचायत यावेळी कोणत्याही परिस्थितीत काबीज करण्यासाठी आ. निलेश लंके यांनी कंबर कसली असून प्रत्येक प्रभागनिहाय नियोजनही सुरू केले असून अनेक जण इच्छुक आहेत. बारामती येथे आ. निलेश लंके, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे, युवक तालुकाध्यक्ष अशोक घुले, आनंदा औटी, साहेबराव देशमाने, दिनेश औटी, विलास सोबले, उद्योजक विजय औटी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत