विखे, कदम, पिचड, मुरकुटे, कोल्हेना संधी ; माजीमंत्री शिवाजीराव कर्डीलेंचा पत्ता मात्र कट - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

विखे, कदम, पिचड, मुरकुटे, कोल्हेना संधी ; माजीमंत्री शिवाजीराव कर्डीलेंचा पत्ता मात्र कट

अहमदनगर : वेबटीम      भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी नुकत्याच जाहीर केलेल्या जम्बो प्रदेश कार्यकारिणीत पंकजा मुंडे गट...


  • अहमदनगर : वेबटीम 
        भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी नुकत्याच जाहीर केलेल्या जम्बो प्रदेश कार्यकारिणीत पंकजा मुंडे गटाला डावलून त्यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गटाचीच छाप दिसून येत आहे. दरम्यान, या कार्यकारिणीत नगरचे विखे पाटील, राम शिंदे, बाळासाहेब मुरकुटे, वैभव पिचड, स्नेहलता कोल्हे तसेच चंद्रसेखर कदम यांना स्थान मिळाले असताना माजी मंत्री शिवाजी कर्डीले यांना डावलल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये संतापाची लाट आहे    मुंडे गटाचा शिक्का असल्यानेच माजी मंत्री शिवाजी कर्डीले यांना या कार्यकारिणीतुन बाहेर फेकल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. 
     चंद्रकांत दादा अध्यक्ष असलेल्या या कमिटीची काळ घोषणा करण्यात आली,  त्यात 12 उपाध्यक्ष असून त्यामध्ये नगरचे  माजी मंत्री राम शिंदे यांचा समावेश आहे, याशिवाय 5 महामंत्री आहेत, तसेच 12 मंत्री असून त्यात कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे याना जागा मिळाली आहे,  प्रदेश कार्यकारिणी समिती सदस्य म्हणून 68 जनांची वर्णी लागली असून त्यात नगरचे भानुदास  बेरड यांना स्थान देण्यात आले आहे,   प्रदेश कार्यसमिती निमंत्रित सदस्य 139 आहेत, यात माजी आमदार चंद्रसेखर कदम, माजी बाळासाहेब मुरकुटे, माजी वैभव पिचड यांचा समावेश आहे, तर विशेष निमंत्रीतमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत विखे पाटील, मधुकरराव पिचड आदी पहिल्या फळीतील नेत्यांची निवड करण्यात आली आहे

 वास्तविकता, भाजपच्या या कार्यकारिणीत पराभूत झालेली नेत्यांचे पुनर्वसन करण्यात आले आहे, किंबहुना त्यांना पक्षाने प्रवाहात कायम ठेवले आहे, मात्र, या कार्यकारिणीत कुठंतरी गट- तटाचे राजकारण झाल्याचे बोलले जात आहे, या समितीमध्ये  चार -पाच पंचवार्षिक गाजवले भाजपचे माजी आमदार शिवाजीराव कर्डीले यांचे नाव यादीमध्ये शोधूनही कुठेही सापडले नाही, कर्डीले हे जिल्ह्यात भाजपचे मोठे नेते आहेत, त्यांनी पक्ष वाढीसाठी केलेला प्रयत्न सर्वांनी पाहिला आहे, मात्र, एकीकडे मुरकुटे, पिचड, कोल्हे आणि कदम यांना या महत्वाच्या कमिटीत स्थान दिले जात असताना कर्डीलेना डावलणे हा चर्चेचा विषय ठरला आहे ,  त्यामुळे या निवडीतून कर्डीलेना पक्षात काडीचीही किंमत नसल्याची टीका विरोधक करणार आहेत, असो, कर्डीले यांना डावलले तर आमदार मोनिका राजळे यांनाही कोणती महत्वाची जबाबदारी दिलेली नाही, विशेष म्हणजे मुख्यमंत्री पदासाठी दावेदार समजल्या जाणाऱ्या व नुकत्याच जाहीर झालेल्या राज्य कार्यकरिणीतुन डावललेल्या पंकजा मुंडे यांचे समर्थक म्हणून कर्डीले व राजळे यांना पाहिले जात असल्यानेच 'हे' राजकारण घडल्याची चर्चा आहे, आता हा अपमान कर्डीले गिळून घेणार की पक्ष श्रेष्ठीना याचा जाब विचारणार, हे लवकरच समजणार आहे, मात्र हे राजकीय भूकम्पाचे लक्षण आहेत, हे नक्की ..! (भाजप कार्यकारिणीत कर्डीले साहेबांचे नाव पेपरमध्ये शोधले मात्र ते दिसले नाही, असे उत्तर त्यांच्या पीएने दिले)     दरम्यान, या कार्यकारिणीत निवड झालेले माजी आमदार बालासाहेब मुरकुटे यांचे  कर्डीले यांचे नाव यादीत नसल्याकडे लक्ष वेधल्यानंतर त्यांनी अजून काही निवडी राहिल्या आहेत, त्यांच्या सिनियरीटी नुसार त्यांना संधी मिळेल, असे त्यांनी सांगितले, मात्र आता ती कोणती समिती असेल, हे त्यांनी सांगितले नाही

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत