राहुरी : वेबटीम सध्या वातावरणातील प्रचंड बदलामुळे कांदा साठवणूक केलेला शेतकरी संकटात सापडला आहे, या परिस्थितीचा फायदा घेत काही कांदा व्या...
सध्या वातावरणातील प्रचंड बदलामुळे कांदा साठवणूक केलेला शेतकरी संकटात सापडला आहे, या परिस्थितीचा फायदा घेत काही कांदा व्यापाऱ्यांनी शेतकऱयांची कवडीमोल दरात कांदा खरेदी करून मोठी लूटमार सुरू केली आहे, उंबरे परिसरातही असाच 'जगा'ला 'ताप' ठरणारा व्यापारी दिवसाढवळ्या कांदा उत्पादकांला एक भाव ठरवून दुसराच भावाने पैसे देउन फसवणूक करत असल्याचा प्रकार समोर आला आहे.
वांबोरी परिसरातील हा व्यापारी स्वतःला शेतकरी म्हणून संबोधत असला तरी कांदा उत्पादकांच्या परिश्रमाची, त्याने केलेली मशागत, कांदा लागवड, खते, औषधे, फवारणी, काढणी, साठवणूक याच्या खर्चाचे त्याला काहीही घेणेदेणे नाही, एकीकडे पाऊस सुरू आहे, वातावरण दमट होत असताना कांदा टिकेल की नाही शास्वती नाही, अशा प्रसंगी या व्यापाऱ्याने 500 ते 600 रुपये कवडीमोल दराने कांदा खरेदी सुरू केला आहे, बिचारा शेतकरी अडचणीत असल्याने तो हा सौदा मंजूर करतो, मात्र हा व्यापारी त्यानंतरही शेतकऱ्यांचे रक्त शोषण करण्याचे थांबवत नाही, ज्या भावात सौदा ठरला, कोणतीही कपात ठरलेली नसताना त्यात पुन्हा काटछाट करून तो शेतकऱ्याचा तळतळाट घेण्याचे पाप करत आहे, तसेच परस्पर वजन काटा करणे, बोली नसताना गोल्टी काढणे, जाणीवपूर्वक खराब कांदा म्हणून जास्त कांदा बाहेर काढणे, व शेवटी कमी भावात तो घेऊन जाणे, अशा प्रकारे वांबोरी, उंबरे, ककुडवेढे, ब्राम्हणी परिसरात अनेक तक्रारी आहेत, उंबरे गावातही या व्यापाऱ्याने अनेकांना गँडा घातलेला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी या व्यापाऱ्याने कवडीमोल दरात कांदा मागून चेष्टा केली, तर त्याला धडा शिकवावा, किंवा त्याने चांगल्या दरात सौदा केला तरी तो शब्द फिरविणारा असल्याने त्याच्याकडून लिहून हा सौदा कसा ठरला, हे लिहून घ्यावे, तरच फसगत थांबेल अन्यथा कंटेन्मेंट मधील हा कोरोना गावातील शेतकऱ्यांचे रक्त पिल्याशिवाय राहणार नाही, असे आवाहन छत्रपती प्रतिष्ठानकडून करण्यात आले आहे
शेतकऱ्यावर उपकाराची भाषा दाखविणाऱ्या या संबंधित व्यापाऱ्याने केलेल्या फसवणुकीची जिल्हाधिकारी, सहायक निबंधक, पोलीस स्टेशन यांच्याकडे काही शेतकरी तक्रार दाखल करणार असल्याची माहिती आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत