ब्राम्हणी : वेबटीम ब्राम्हणी गावात मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत 8 ठिकाणी धाडसी चोऱ्या केल्याने गावात खळबळ उडाली आहे. दरम...
ब्राम्हणी : वेबटीम
ब्राम्हणी गावात मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत 8 ठिकाणी धाडसी चोऱ्या केल्याने गावात खळबळ उडाली आहे. दरम्यान, या चोरट्यांनी एका गिरणीतून पीठ तर एका किराणा दुकानातून जीवनावश्यक वस्तू पळविल्याने लॉकडाऊनचा हा एक परिणाम समजला जात आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, ब्राम्हणी गावातील पेपर विक्रेते गोरक्षनाथ तेलोरे यांच्या घराच्या स्वयंपाक घरात चोरट्यांनी शिताफीने प्रवेश करत कपाट फोडले व त्यातून दोन तोळे सोन्याचे दागिने लंपास केले, तसेच काही रोकड ही पळविली, त्यानंतर या चोरट्यानी आपला मोर्चा नहार यांच्या किराणा दुकानाकडे वळवत तेथून किराणा माल पळवून नेला, त्यानंतर एका गिरणीत चोरट्यांनी चक्क पिठाची चोरी करून पोबारा केला. त्यानंतर बसस्थानक परिसरातील किराणा दुकान फोडून या चोरट्यांनी तेथूनही किराणा माल चोरी केला, याशिवाय एका चप्पल दुकानात चोरट्यांनी हात साफ करत काही पैसे आणि चपला पळविल्या. दरम्यान, या घटनेची सकाळी गावात वाऱ्यासारखी बातमी पसरताच एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच राहुरीचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामे केले, लवकरच आरोपींचा शोध घेऊ अशी ग्वाही पोलिसांनी ग्रामस्थांना दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत