अहमदनगर: वेबटीम जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा दररोज वाढत असतानाच या आजारातून बरे होण्याचे प्रमाण देखील चांगले असल्याचे दिसून येत आह...
अहमदनगर: वेबटीम जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा दररोज वाढत असतानाच या आजारातून बरे होण्याचे प्रमाण देखील चांगले असल्याचे दिसून येत आहे. आज उपचार सुरू असलेले तब्बल ४०८ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला असून ते सुखरूप घरी परतणार आहेत.
जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असल्याने समाधान आहे, त्यात प्रशासन व नागरिकांचा समनव्य असल्याने कोरोनाची साखळी तोडण्यात थोडयाफार प्रमाणात यश आले असले तरी येणाऱ्या काळात हे प्रमाण वाढणार आहे, तूर्त तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असल्याने नागरिकांच्या मनातील भीती काही प्रमाणात दूर झाली आहे. आज घरी सोडण्यात येत असलेल्या रुग्णाची आकडेवारी खालील प्रमाणे. नगर शहर २२३
संगमनेर ५३
राहाता १७
पाथर्डी २
नगर ग्रा.२५
श्रीरामपूर २१
कॅन्टोन्मेंट १
नेवासा १०
पारनेर ७
राहुरी १०
शेवगाव १
कोपरगाव ३
श्रीगोंदा १५
कर्जत १४
अकोले ५
जामखेड१
*बरे झालेली रुग्ण संख्या:३३५७*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत