मुंबई: वेबटीम राजस्थानातील सरकार पाडण्याकरिता सत्ताधारी काँग्रेस आमदारांना विकत घेण्यासाठी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी बिल्डर आणि ...
मुंबई: वेबटीम राजस्थानातील सरकार पाडण्याकरिता सत्ताधारी काँग्रेस आमदारांना विकत घेण्यासाठी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी बिल्डर आणि व्यावसायिकांकडून ५०० कोटी रूपये जमवले आहेत, असा खळबळजनक आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.केंद्रातील भाजपचे सरकार सत्ता, पैसा, सीबीआय, ईडी, इन्कम टॅक्स यांचा वापर करून विविध राज्यातील विरोधी पक्षांची सरकारे पाडण्याचा प्रयत्न करत आहे. महाराष्ट्रातील भाजप नेते यासाठी वापरले जात आहेत. कर्नाटकातील काँग्रेस जेडीएसचे सरकार पाडण्यासाठी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांचा वापर केला गेला होता. कर्नाटकच्या आमदारांना भाजप सरकारच्या काळात मुंबईच्या हॉटेलात पोलीस बंदोबस्तात डांबून ठेवले होते. महाराष्ट्रातील भाजपच्या ज्येष्ठ मंत्र्याच्या घरी यासंदर्भातल्या बैठका होत होत्या, हे राज्यातील जनतेने पाहिले आहे. आताही महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी बिल्डर आणि व्यावसायिकांकडून ५०० कोटी रूपये जमा करून राजस्थान सरकार पाडण्यासाठी पाठविले आहेत, अशी खात्रीशीर माहिती आपल्याला मिळाली, असल्याचे सचिन सावंत यांनी नमूद केले.
आपण यासंदर्भात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी चर्चा केली आहे. गृहमंत्र्यांनी याबाबतीत त्यांच्या विभागाकडून माहिती घेतली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत