पती गेला ; मृतदेह मात्र दुसऱ्याचाच आला ! जिल्ह्यात खळबळ उडविणारी घटना - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

पती गेला ; मृतदेह मात्र दुसऱ्याचाच आला ! जिल्ह्यात खळबळ उडविणारी घटना

संगमनेर : वेबटीम          सध्याच्या कोरोना संकटात प्रशासनाचा निष्काळजीपणा अनेकदा समोर आला आहे. त्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या काहींचे...

संगमनेर : वेबटीम     
    सध्याच्या कोरोना संकटात प्रशासनाचा निष्काळजीपणा अनेकदा समोर आला आहे. त्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या काहींचे मृतदेह तर दुसऱ्याच घरी अंत्यविधीसाठी गेल्याचे किस्से समोर येत आहे, नुकतेच संगमनेर येथेही असाच प्रकार घडल्याने मोठा संताप व्यक्त केला जात आहे.   
 संगमनेर शहरातील उच्चभ्रु लोकवस्तीत राहणार्‍या एका तरुणाचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यु झाला होता.  शासनाने नव्याने जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोविडने मृत्युमुखी पडणार्‍या रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यु झाल्यास व मृताच्या नातेवाईकांनी मागणी केल्यास संबंधित मृतदेह त्यांच्याकडे सुपूर्द केला जातो. मात्र त्याच्या संपर्कात येणार्‍या सर्वांना पुढील सात दिवस विलगीकरणात आरोग्य यंत्रणांच्या निरीक्षणाखाली रहावे लागते. या तरतूदीनुसार संगमनेरातील ‘त्या’ तरुणाच्या मृतदेहाची मागणी करण्यात आली व जिल्हा आरोग्य यंत्रणेने ती मान्यही केली व त्या तरुणाचा मृतदेह त्याच्या नातेवाईकांच्या हवाली करण्यात आला. नगरमधील रुग्णवाहिकेतून सदरचा मृतदेह घेवून त्याचे नातेवाईक संगमनेरातही पोहोचले. तो पर्यंत सर्वकाही ठिकठाक होतं.
     मृत व्यक्तिच्या घराजवळ रुग्णवाहिका येताच त्याच्या आप्तजनांनी एकच टाहो फोडला, त्यामुळे परिसरातील वातावरण धीरगंभीर बनले होते. मात्र मृतदेह बाहेर काढून घराजवळ नेण्याची परवानगी नसल्याने मृताच्या कुटुंबियांनी रुग्णवाहिकेत जावूनच त्याचे अंत्यदर्शन घ्यायला सुरुवात केली. मृताच्या पत्नीलाही अंत्यदर्शनासाठी रुग्णवाहिकेत नेण्यात आले. पतीच्या अकाली मृत्युने आभाळ कोसळलेल्या त्या माऊलीने रुग्णवाहिकेत जावून पतीचा चेहर शेवटचा पाहण्याची इच्छा वर्तवली आणि तीने त्याचा चेहरा पाहीलाही, मात्र त्यानंतर सगळा नूरच पालटला.
‘ही व्यक्ति आपला पती नसून अन्य कोणी असल्याचे’ तीने सांगताच अंत्यविधीसाठी जमलेल्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. मृतदेहाच्या जवळ जाण्याची परवानगी असलेल्यांपैकी काहींनी जवळ जात खात्री केली असता त्या महिलेच्या शब्दात पूर्णतः सत्यता असल्यची खात्री त्यांना पटली आणि काहीवेळापूर्वी दुःखात बुडालेल्या त्या परिसरात विविध चर्चांना अक्षरशः ऊत आला. हा सगळा प्रकार पाहुन यंत्रणेकडून मोठे आक्रांत घडल्याची कल्पना आल्याने त्या रुग्णवाहिकेच्या चालकाने मृतदेह घेवून तेथून पळ काढला, आणि या विषयावर पडदा पडला. मात्र सदरच्या तरुणाचा मृतदेह मिळाला की नाही? याचे उत्तर मात्र अद्यापही मिळू शकलेले नाही. कोणाचाही मृतदेह कोणाच्याही दारात पाठविण्याच्या या प्रकारातून जिल्हा रुग्णालयात सुरु असलेला सावळा गोंधळही चव्हाट्यावर आला असून एकाच आठवड्यात घडलेली ही तिसरी घटना ठरली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत