वांबोरी : वेबटीम श्री संत शिरोमणी सावता महाराज यांचा उद्या ७२५ वा संजीवन समाधी सोहळा आहे, सर्व समाज बांधवांनी कोरोना विषाणू संक्रमण...
वांबोरी : वेबटीम श्री संत शिरोमणी सावता महाराज यांचा उद्या ७२५ वा संजीवन समाधी सोहळा आहे, सर्व समाज बांधवांनी कोरोना विषाणू संक्रमण पाहता यंदा घरीच समाधी सोहळा साजरा करावा, असे आवाहन सावता माळी युवक संघाचे जिल्हाध्यक्ष अशोकराव तुपे यांनी केले आहे. आज रविवार दि १९ जुलै रोजी श्री संत शिरोमणी सावता महाराज यांचा ७२५ वा संजीवन समाधी सोहळा आहे . दर वर्षी महाराष्ट्रासह अ.नगर जिल्ह्यात व वांबोरी येथेही अखंड हरिनाम सप्ताह, किर्तने,प्रवचने, अन्नदान यांचे आयोजन करून साजरा करन्यात येत असतो परंतू यावर्षी संपूर्ण जगात कोरोना महामारीने थैमान घातले आहे या महामारी विरोधात शासन जनतेच्या रक्षनासाठी विविध प्रकारच्या उपाय योजना करत आहे , याच पार्श्वभूमीवर सर्वांनी शासनाला सहकार्य करावे व श्री संत शिरोमणी सावता यहाराज समाधी सोहळा घरीच करावा व आपली व आपल्या परीवाराची काळजी घ्यावी असे अवाहन श्री संत सावता माळी युवक संघ अ.नगर दक्षिण जिल्हा अध्यक्ष अशोक बाबासाहेब तुपे यांनी केले आहे तसेच श्री संत शिरोमणी सावता महाराज समाधी सोहळ्या निमित्त श्री संत सावता माळी युवक संघटनेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन दक्षिण जिल्हा अध्यक्ष अशोक तुपे, राहुरी तालुका अध्यक्ष दिपक साखरे, वांबोरी शहराध्यक्ष सुनिल शिंदे, राहुरी तालुका सचिव भरत सत्रे यांनी केले आहे

कोणत्याही टिप्पण्या नाहीत