गावाचे ‘प्रशासक’ पद जनतेने व पत्रकारांनी ठरवावे ; मतप्रवाह सुरूच ! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

गावाचे ‘प्रशासक’ पद जनतेने व पत्रकारांनी ठरवावे ; मतप्रवाह सुरूच !

मुंबई : ःवेबटीम    मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतीच्या प्रशासक पदाची निवड कशी करावी, यावरून राज्यात सुरू असलेल्या वादात आता दररोज नव्या सू...

मुंबई : ःवेबटीम 
  मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतीच्या प्रशासक पदाची निवड कशी करावी, यावरून राज्यात सुरू असलेल्या वादात आता दररोज नव्या सूचना, नवे निर्णय होत आहेत. आता गावातील सरपंच व उपसरपंच यांच्याकडून पोलिस पाटील व तंटामुक्ती अध्यक्षांना ‘प्रशासक’ पद द्यावे, अशी मागणी असतानाच गावातील प्रशासक पद हे गावातील जनतेने व पत्रकारांनी सर्वे करून ठरवावे, असे भाजपाच्या पदाधिकार्‍यांनी सुचविल्याने प्रशासक पदाची ही निवड गावोगावी चांगलीच गाजण्याची शक्यता आहे. 
  महाराष्ट्रातील ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपलेली आहे, अशा ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्या संदर्भात राज्य शासन दररोज नवीन परिपत्रक काढत आहे. त्यामुळे या निर्णयाचा जणू खेळखंडोबाच झाल्याचं दिसून येत आहे. रोज नवीन परिपत्रक काढून ग्रामीण भागातील जनतेची दिशाभूल करण्याचं काम सरकारकडून केलं जात आहे. सुरवातीला राजकीय व्यक्तींना प्रशासक म्हणून नेमण्याच्या हालचाली झाल्या. त्यानंतर योग्य व्यक्तीची प्रशासक म्हणून नेमणूक करावी असं परिपत्रक काढलं. त्यामुळे सरकारने योग्य व्यक्तीची व्याख्या सांगावी अशी मागणी होताना दिसत आहे
 कर्जत तालुक्यातील  भाजपाा पदाधिकार्‍यांनी दिलेल्या निवेदनात गावातील तमाम जनता व गावातील पत्रकारांनी एकत्रीत सर्वे करून गावातील एका ‘योग्य व्यक्ती’ची या पदासाठी निवड करावी, अशी प्रक्रिया राबविली तरच यात राजकारण घुसणार नाही व वादही वाढणार नाही, असे मुख्यमंत्र्यांना कळविले आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत