राहुरी : वेबटीम गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सडे, पिंप्री अवघडमधून जाणाऱ्या देव नदीला पूर आला आहे, तर उंब...
राहुरी : वेबटीम
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सडे, पिंप्री अवघडमधून जाणाऱ्या देव नदीला पूर आला आहे, तर उंबरेची करपरा नदीही दुथडी वाहताना दिसत आहे. दरम्यान, काही भागात विशेषतः उंबरे, ब्राम्हणी, वांबोरी परिसरात झालेल्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे। .
पावसानं देेेवनदीवर असलेल्या पुलाचा काही भाग वाहून गेला. सडे गावाचा राहुरीशी संपर्क तुटला. वांबोरी येथेही करपरा नदी दुथडी भरून वाहती झाल्याचे दिसून आले. राहुरी मंडळामध्ये 62.8 मिमी पावसाची नोंद झाली. वांबोरी 119 मिमी, देवळाली प्रवरा मंडळात 57 मिमी, सात्रळ 41 मिमी, ब्राम्हणी 41 मिमी, टाकळीमिया 24, ताहाराबाद 60 मिमी अशा प्रकारे सातही मंडळात धो धो पाऊस पडल्याची नोंद घेण्यात आली.
दरम्यान, काही भागात अधिक प्रमाणात झालेल्या पावसामुळे शेतकर्यांच्या खरीप पेरण्यांचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. याबाबत कृषि विभागाकडून दखल घेण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. मुळा धरणाच्या लाभ क्षेत्रावर पावसाची मोठी कृपादृष्टी होत असताना पाणलोट क्षेत्रात अजूनही अपेक्षेनुरूप कृपा झालेली नाही. तुरळक प्रमाणात पाऊस पडत असल्याने धरणाकडे 1 हजार 900 क्यूसेक प्रवाहाने पाण्याची आवक होत होती. मुळा धरणाच्या बॅक वाटरकडून कमी प्रमाणात आवक होत असताना लाभक्षेत्रातील मुळानगर येथे 63 मिमी पावसाची नोंद झाली
कोणत्याही टिप्पण्या नाहीत