शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन पद्धतीनेच कराव्यात - विधानपरिषद विरोधी पक्षनेते मा प्रवीण दरेकर यांची मागणी - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन पद्धतीनेच कराव्यात - विधानपरिषद विरोधी पक्षनेते मा प्रवीण दरेकर यांची मागणी

पुणे : वेबटीम   राज्यातील शिक्षकांच्या बदल्या ऑनलाइन पद्धतीनेच कराव्यात अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविणजी दरेकर यांनी ...


पुणे : वेबटीम 
राज्यातील शिक्षकांच्या बदल्या ऑनलाइन पद्धतीनेच कराव्यात अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविणजी दरेकर यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री मा. ना.हसन मुश्रीफ साहेब यांच्या कडे लेखी  निवेदनाद्वारे मागणी केली असल्याची माहीती शिक्षक परिषदेचे राज्य अध्यक्ष  राजेश सुर्वे यांनी  दिली आहे.


राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने दि.१५ जुलै २०२० रोजी आदेश काढुन राज्यातील जिल्हापरिषद शाळेतील कार्यरत शिक्षकांच्या बदल्या दि.२७ फेब्रुवारी २०१७ च्या शासन निर्णयानुसार ३१ जुलै २०२०पुर्वी आँफलाईन पद्धतीने कराव्यात असे निर्देश दिले आहेत पण आँफलाईन पद्धतीने बदल्या केल्यास  त्यात मानवी हस्तक्षेप होऊन गैरप्रकार होऊ शकतात.   त्यामुळे शिक्षकांच्या बदल्या या आँनलाईन पद्धतीनेच होणे गरजेचे आहे.
     आँनलाईन जिल्हांतर्गत  बदल्या करत असताना कोविड-19 संसर्गजन्य साथ असताना काळजी घेणे गरजेचे आहे. राज्य शासनाने फेब्रुवारी २०२० मध्ये राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदली धोरणावर पुनर्विचार करून निर्णय घेण्यासाठी पुण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.आयुष प्रसाद साहेब  यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली होती, या समितीने राज्य स्तरावर आणि विभागीय स्तरावर शिक्षक संघटनेच्या प्रतिनिधीशी चर्चा केली होती. या चर्चेत  राज्यातल्या सर्व प्राथमिक शिक्षक संघटनेच्या सर्व प्रतिनिधीनी जिल्हा अंतर्गत व आंतरजिल्हा बदल्या ऑनलाइन पद्धतीनेच कराव्यात अशी एकमुखी मागणी केलेली होती. ऑनलाइन बदल्याना सर्व शिक्षक संघटनेचा विरोध आहे, समितीच्या अहवाला नुसार नवीन  बदली धोरण जाहीर करून बदल्या करणे अपेक्षित असताना, सध्या कोविड-१९ चा संसर्ग वाढलेला असताना

ऑफलाईन बदल्या करण्याचा घाट घालणे चुकीचे आहे.
२७ फेब्रुवारी २०१७ च्या बदली धोरणातील त्रुटी दूर करून ऑनलाइन पद्धतीनेच बदल्या करण्यात याव्यात .                   देशातील व राज्यातील कोविड-१९ व लाॅकडाऊन चा काळ  विचारात घेऊन शिक्षकांच्या बदल्या ३१ जुलै २०२० अखेर पर्यंत न करता १५ ऑगस्ट २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी. अशी  मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक  विभागांच्या वतीने ग्रामविकास मंत्री मा.ना.हसन मुश्रीफ सो.,यांच्या कडे   लेखी निवेदन दारे राज्याचे विधानपरिषद विरोधी पक्ष नेते मा श्री प्रवीण भाऊ दरेकर साहेबांनी केली आहे.  राज्याध्यक्ष श्री  राजेश सुर्वे , कार्याध्यक्ष मधुकर उन्हाळे,     बाबुराव पवार,  कार्यवाह सुधाकर मस्के ,संघटक मंत्री सुरेश दंडवते,   राज्य संपर्क प्रमुख रावसाहेब रोहकले गुरूजी   , पुरुषोत्तम काळे , कोषाध्यक्ष संजय पगार,  प्रकाश चतरकर,अविनाश तालापलीवार, मंच्छित्र गुरमे  , प्रकाश चुनारकर, राजेंद्र नांद्रे, मंगेश जैवाळ, बाबुराव गाडेकर , सुनील केणे ,   संजय निजापकर , भरत मडके , डॉ सतपाल‌ सोवले , प्रविण ठुबे , विकास गवते ,‌संजय शेळके  ,  महादेव चाटे, श्रीराम बोचरे, डि.एम.पंडागळे.  दिलीप पाटील ,  विजय साळवे , विलास बोबडे , राजेंद्र शिंगाडे , रमेश गोहील, आबा बच्छाव , अवधूत वानखेडे , निळकंठ गायकवाड ,प्रकाश महाजन  ,प्रशांत वाघमारे  , भगवान घरत  , शांताराम घुले  , संजय कोठाले , भगवान जायभाय  ,  उमेश पाटील, शैलेश चौकशे ,  राजेंद्र चौधरी,कृष्णकांत मलिक ,भिका सकपाळे   यांनी  लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे अशी माहिती राज्यप्रसिद्धी प्रमुख श्री रविकिरण पालवे यांनी दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत