देशाच्या राजकारणात खळबळ माजणार ; पवारांची 'ती' स्फोटक मुलाखत ठरणार वादग्रस्त - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देशाच्या राजकारणात खळबळ माजणार ; पवारांची 'ती' स्फोटक मुलाखत ठरणार वादग्रस्त

मुंबई: वेबटीम महाराष्ट्राच्या राजकारणात महाविकास आघाडीच्या रूपाने अभूतपूर्व असं 'सत्ताकारण' पाहायला मिळालं आहे. काँग्रेस आणि र...

मुंबई: वेबटीम

महाराष्ट्राच्या राजकारणात महाविकास आघाडीच्या रूपाने अभूतपूर्व असं 'सत्ताकारण' पाहायला मिळालं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पूर्णपणे भीन्न विचारसरणीच्या पक्षांसोबत शिवसेनेने आघाडी करत भाजप या आपल्या जुन्या मित्राला शह दिला आहे. ही राजकीय उलथापालथ ज्यांनी घडवली ते महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार आणि त्यांना यात साथ देणारे त्यांचे शिवसेनेतीतील विश्वासू संजय राऊत एका वादळी मुलाखतीचा 'बॉम्ब' टाकण्यासाठी सज्ज झाले आहेत. 

संजय राऊत यांनीच एका ट्विटच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली आहे. शिवसेनेचे मुखपत्र ' सामना 'चे कार्यकारी संपादक असलेल्या संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची मुलाखत घेतली आहे. पवार यांची ही जोरदार राजकीय मुलाखत देशाच्या राजकारणात खळबळ माजवेल, असा दावा करून राऊत यांनी सर्वांचीच उत्सुकता वाढवली आहे. 'देशाचे नेते शरद पवार यांच्याशी आज दिलखुलास गप्पा झाल्या. चीनपासून महाराष्ट्रातील घडामोडींपर्यंत शरद पवार जोरदार बोलले. ही मुलाखत लवकरच प्रसिद्ध होणार आहे', असे राऊत यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे. एकंदरच राऊत यांनी घेतलेली शरद पवार यांची ही मुलाखत सद्यस्थितीत अनेक अर्थांनी महत्त्वाची ठरणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत