4 लाख महिलांना संधी ; ना.गडकरी MSME मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच एक मोठी घोषणा केली आहे. त्यात, 10 लाख महिलांना आ...
4 लाख महिलांना संधी ; ना.गडकरी
MSME मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच एक मोठी घोषणा केली आहे. त्यात, 10 लाख महिलांना आम्ही सोलर चरखा देणार आहोत. या सोलर चरख्यावर दररोज 4 तास काम केल्यानंतर प्रत्येक महिन्याला महिलेला 20000 पर्यंत रोजगार मिळू शकतो. हे सूत आमचे मंत्रालय खरेदी करेल, असे नितीन गडकरी यावेळी म्हणाले. यामुळे महिलांच्या हाताला कामही मिळेल, आणि कोरोनाच्या संकटात घर चालविण्यासाठी त्यांचा मोठा हातभार लागेल.
कोरोनानंतर आयुष्यात मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यादरम्यान समाजातील वागणूक यासह कामामध्येही मोठा बदल घडू शकतो. कोरोनाच्या काळात अनेक कंपन्या बंद ठेवण्यात आल्या होत्या. आता हळूहळू त्या खुल्या होत आहेत. मात्र अनेक कंपन्यांनी वेतनकपातीसह अनेक कामगारांना कामावरुन कमी केले आहे. अशा परिस्थितीत नागरिकांना घरातून लघुउद्योग आदी सुरू करण्याची गरज निर्माण होणार आहे. तर दुसरीकडे एमएसएमईमध्ये मोठा बदल होऊ शकतो.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत