आज सोमवती अमावश्या ; काय आहे महत्व, एकदा नक्की वाचा ...! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

आज सोमवती अमावश्या ; काय आहे महत्व, एकदा नक्की वाचा ...!

मुंबई  : वेबटीम  आज सोमवार दि 20 जुलै, आज सोमवती आमावस्या आहे. आज अमावास्येला महादेव शिवशंकराची उपासना करणे लाभदायक असते. धर्म शास्त्रा...

मुंबई  : वेबटीम 
आज सोमवार दि 20 जुलै, आज सोमवती आमावस्या आहे. आज अमावास्येला महादेव शिवशंकराची उपासना करणे लाभदायक असते. धर्म शास्त्रात सोमवती अमावास्येचे महत्त्व सांगण्यात आले आहे. पौराणिक मान्यतेनुसार, सोमवारी अमावास्या सुरू होणे, भाग्यकारक मानले गेले आहे. या दिवशी स्नान, दान आणि पूजाविधीचे वेगळे महत्त्व आहे. 

सोमवती अमावास्या तिथी
आषाढ महिन्यातील अमावास्या सोमवारी येत असल्यामुळे तिला सोमवती अमावास्या असे संबोधले गेले आहे. श्रावण महिन्यातील शिवपूजन अधिक शुभ आणि पुण्यदायक मानले गेले आहे.

सोमवती अमावास्याः २० जुलै २०२०

अमावास्या आरंभः १९ जुलै २०२० रोजी उत्तर रात्रौ १२ वाजून १० मिनिटे

अमावास्या समाप्तीः २० जुलै २०२० रोजी रात्रौ ११ वाजून ०२ मिनिटे

उत्तर भारतात श्रावण सुरू झाल्यामुळे ही अमावास्या श्रावण अमावास्या म्हणून साजरी केली जाणार आहे. याशिवाय सोमवती अमावास्येदिनी श्रावणातील सोमवार असल्यामुळे याचे महत्त्व दुपटीने वाढले आहे.

​महादेवाचे पूजन लाभदायक
सोमवार हा महादेव शिवशंकराच्या पूजनासाठी विशेष मानला जातो. म्हणूनच सोमवती अमावास्येला शंकराचे नामस्मरण, पूजन, भजन करण्याने विशेष पुण्य प्राप्त होते, असे मानले जाते. या दिवशी सूर्य आणि चंद्र ग्रह सरळ रेषेत असतात, अशीही मान्यता आहे. या दिवशी काही जण विशेष व्रत आचरतात. या दिवशी सुवासिनी महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी विशेष प्रार्थना, व्रत करतात. सोमवती अमावास्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते. सध्याच्या परिस्थितीत घरीच राहून शिवपूजन करावे. घरातील महादेवावर अभिषेक करावा. शिवपूजन झाल्यानंतर 'ॐ नमः शिवाय' या मंत्राचा १०८ वेळा जप करावा.

सोमवती अमावास्येची कथा
सोमवती अमावास्येच्या अनेक कथा प्रचलित आहेत. यामध्ये एका गरीब ब्राह्मण दाम्पत्याची कथा प्रसिद्ध आहे. या दाम्पत्याला सर्वगुण संपन्न अशी एकुलती एक मुलगी होती. मुलगी विवाहयोग्य झाल्यावर वडिलांनी वर शोधण्यास सुरुवात केली. मात्र, योग्य वर मिळत नव्हता. विवाह योग जुळून येत नव्हता. एके दिवशी एक साधू या ब्राह्मणाच्या घरी आला. मुलीने केलेल्या सेवेने तो प्रभावित झाला आणि त्या मुलीला दीर्घायुष्याचा आशिर्वाद दिला. यावेळी ब्राह्मणाने विवाह जुळत नसल्याचे सांगितले. यावर, मुलीच्या हातावर विवाह रेषा नसल्याचे साधूने कथन केले. यावर साधू महाराजांनी ब्राह्मणाला एक उपाय सांगितला.

​कुंकवाचे दान
साधूचे कथन ऐकून ब्राह्मण कन्येने सोना नामक धोबी महिलेची सेवा करण्याचा निश्चय केला. सूर्योदयापूर्वी त्या महिलेच्या घरी जाऊन ती कन्या सेवा करत असे. महिलेला वाटे की, आपली सून हे सर्व काम करते. मात्र, सूनेला विचारल्यावर आपण दिवसभर आराम करत असल्याचे ती सांगते. दुसऱ्या दिवशी सकाळी पाहिल्यास एक कन्या येऊन सर्व काम करताना दिसते. ब्राह्मण कन्येला तिच्या कृतीचा जाब विचारल्यावर ती त्या महिलेला शरण जाते आणि तिची समस्या कथन करते. धोबी महिला दुसऱ्या दिवशी येऊन कुंकू घेऊन जाण्याबाबत आश्वस्थ करते. दुसरा दिवस हा सोमवती अमावास्येचा असतो. आपले कुंकू दिल्याने पतीचे निधन होईल, हे महिलेला ठाऊक असते. मात्र, तरीही ती ब्राह्मण कन्येच्या घरी जाऊन तिला कुंकू देते. सोमवती अमावास्येच्या दिनी विशेष व्रत करते आणि पिंपळाच्या झाडाचे पूजनही करते. या व्रतामुळे तिचा पती सुखरूप राहतो, असे कथाख्यान पुराणात सापडते.

​ 
गंगास्नान आणि दानाचे महत्त्व
सोमवती अमावास्या तिथीला केल्या जाणाऱ्या दानाला विशेष महत्त्व प्राप्त होते. ज्या व्यक्तींच्या राशीत चंद्र ग्रह कमकुवत असतो. त्या व्यक्तींनी सोमवती अमावास्येला गोमातेला अन्नदान करावे, असा सल्ला दिला जातो. चंद्र ग्रहाशी संबंधित व्याधी यामुळे दूर होतात, अशी मान्यता आहे. तसेच सोमवती अमावास्येच्या दिवशी गंगास्नानाला विशेष महत्त्व असते. गंगास्नान शक्य नसलेल्या व्यक्तींनी नदी किंवा तलावात स्नान करावे, असे सांगितले जाते.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत