अहमदनगर : वेबटीम जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात पाचशे पेक्षा अधिक करोना रुग्ण वाढले आहे. सोमवारी नगर जिल्ह्यात एकूण बाधितांच्या संख्येत ३...
अहमदनगर : वेबटीम
रविवारी (१९ जुलै) सकाळी करोनामुक्त झालेल्या १०५ जणांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आल्यानंतर जिल्ह्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ही ५१६ वर आली होती. त्यामुळे करोनाची परिस्थिती नियंत्रणात येऊ लागल्याची स्थिती होती. मात्र, आता गेल्या दोन दिवसात पुन्हा एकदा करोनाचे रुग्ण वेगाने वाढू लागले आहेत. काल, नगर जिल्ह्यात तब्बल ३४१ करोना रुग्णांची एकूण रुग्णसंख्येत भर पडल्यामुळे जिल्ह्यातील बाधितांचा आकडा हा दोन हजाराच्या पुढे गेला होता. त्यातच आज पुन्हा जिल्ह्यामध्ये १६५ करोना बाधित वाढले आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यातील बाधितांचा आकडा हा २ हजार १९२ झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार २३३ रुग्ण हे करोनामुक्त झाले आहेत. तर सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ही ९१५ झाली आहे. जिल्ह्यात करोनामुळे ४४ जणांचा मृत्यू झाला आहे. हा आजार बरा होणारा आहे, घाबरून जाण्याचे कारण नाही, मात्र प्रत्यकाने काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनानं केले आहे.
जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात पाचशे पेक्षा अधिक करोना रुग्ण वाढले आहे. सोमवारी नगर जिल्ह्यात एकूण बाधितांच्या संख्येत ३४१ रुग्ण वाढले. तर, आज पुन्हा १६५ बाधित सापडल्याने आता एकूण बाधितांचा आकडा हा २ हजार १९२ वर गेला आहे. दरम्यान, अनेक ठिकाणी अफवा सुरू असल्याने त्याचा प्रशासन व सामान्य जनतेला त्रास सहन करावा लागत आहे.नगर जिल्ह्यात मार्च महिन्यात पहिला करोना बाधित रुग्ण आढळला होता. ३० जूनपर्यंत बाधितांची संख्या ४६५ पर्यंत गेली होती. जुलै महिन्यात मात्र जिल्ह्यात करोनाचा फैलाव वेगाने होऊ लागला. त्यामुळे प्रशासनासमोरील चिंता वाढली होती. त्यातच मागील आठवड्याच्या अखेरीस करोना आजारातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढू लागल्यामुळे काही प्रमाणात प्रशासनाला दिलासा मिळू लागला होता.
रविवारी (१९ जुलै) सकाळी करोनामुक्त झालेल्या १०५ जणांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आल्यानंतर जिल्ह्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ही ५१६ वर आली होती. त्यामुळे करोनाची परिस्थिती नियंत्रणात येऊ लागल्याची स्थिती होती. मात्र, आता गेल्या दोन दिवसात पुन्हा एकदा करोनाचे रुग्ण वेगाने वाढू लागले आहेत. काल, नगर जिल्ह्यात तब्बल ३४१ करोना रुग्णांची एकूण रुग्णसंख्येत भर पडल्यामुळे जिल्ह्यातील बाधितांचा आकडा हा दोन हजाराच्या पुढे गेला होता. त्यातच आज पुन्हा जिल्ह्यामध्ये १६५ करोना बाधित वाढले आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यातील बाधितांचा आकडा हा २ हजार १९२ झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार २३३ रुग्ण हे करोनामुक्त झाले आहेत. तर सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ही ९१५ झाली आहे. जिल्ह्यात करोनामुळे ४४ जणांचा मृत्यू झाला आहे. हा आजार बरा होणारा आहे, घाबरून जाण्याचे कारण नाही, मात्र प्रत्यकाने काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनानं केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत