मुंबई : वेबटीम राज्यात कोरोनाने थैमान घातले असताना त्यात सामान्य जनतेसोबत मंत्री देखील बाधित होताना दिसत आहेत. मंत्री जितेंद्र आव्हाड...
मुंबई : वेबटीम
औरंगाबादमधील सिल्लोडचे शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार सध्या मुंबईत असून करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर तातडीने त्यांनी लीलावती रुग्णालयात उपचार घेतले. सत्तार यांच्यात करोनाची सौम्य लक्षणे आहेत. त्यामुळे चिंतेचे कोणतेही कारण नसून सध्या मुंबईतील शासकीय निवासस्थानात ते आयसोलेशनमध्ये आहेत. सत्तार यांच्या प्रकृतीवर वैद्यकीय पथक लक्ष ठेवून असल्याचे सांगण्यात आले.
राज्यात कोरोनाने थैमान घातले असताना त्यात सामान्य जनतेसोबत मंत्री देखील बाधित होताना दिसत आहेत. मंत्री जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे त्यांनतर आता सेनेचे अब्दुल सत्तर यांना ही कोरोनाची लागण झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. करोनाच्या साथीतही अनेक कारणांनी जनतेत वावरावं लागत असल्याने काही लोकप्रतिनिधींना त्याचा फटका बसला असून आता महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना करोना संसर्गाची लागण झाली आहे. अब्दुल सत्तार यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे प्राथमिक उपचार घेतल्यानंतर सध्या त्यांना शासकीय निवासस्थानीच होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत