दिल्ली : वेबटीम। गेल्या काही दिवसापासून भारत-चीनमध्ये संघर्ष वाढला आहे, मात्र या संदर्भात १४ जुलैला कमांडर स्तरावर एक बैठक झाली. या ब...
दिल्ली : वेबटीम।
भारत चीन सीमेवरील तणाव दूर करण्यासाठी गलवान खोऱ्यातील पीपी -14 आणि पीपी -15 येथूनही सैनिक मागे घेण्यात आले होते. हा पहिला टप्पा पूर्ण झाला. दोन्ही देशांचे सैनिक एक ते दीड किलोमीटर मागे हटले आणि त्या ठिकाणी बफर झोन करण्यात आला. यामुळे आमने-सामने असलेले दोन्ही देशांचे सैनिक मागे हटल्याने तणाव काहीसा कमी झाला. पण हॉट स्प्रिंग भागातून बैठकीत ठरल्या प्रमाणे चिनी सैनिक मागे हटलेले नाहीत. पॅंगॉंग भागात फिंगर -4 मधील चिनी सैनिक 9 जुलैला फिंगर -5 पर्यंत मागे गेले.
१४ जुलैच्या कोअर कमांडर स्तरावरील बैठकीनंतर फिंगर- 4 येथून चिनी सैनिक पूर्णपणे मागे हटतील असं वाटत होतं. पण चिनी सैनिक तिथून मागे हटलेले नाहीत. ते अजूनही तिथेच ठाण मांडून आहेत. सैनिक कशा प्रकारे मागे हटतील? यावर कोअर कमांडर स्तरावरील बैठकीत चर्चा झाली होती. पण प्रत्यक्षात तसं काहीच घडताना दिसत नाहीए. सैनिक मागे हटवण्यासाठी बैठकीत दोन आठवड्यांचा कालावधी निश्चित करण्यात आला होता. आता एक आठवडा उलटून गेला आहे. पहिल्या टप्प्यातही चिनी सैनिक अखेरच्या काही दिवसांमध्ये मागे हटले होते. यामुळे पुढच्या आठवड्यात चिनी सैनिक पँगाँगमधून मागे हटतील, अशी अपेक्षा लष्कराच्या एका अधिकाऱ्याने व्यक्त केली. तरीही कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी भारतीय लष्कर पूर्णपणे सज्ज आहे.
गेल्या काही दिवसापासून भारत-चीनमध्ये संघर्ष वाढला आहे, मात्र या संदर्भात १४ जुलैला कमांडर स्तरावर एक बैठक झाली. या बैठकीत तणावाच्या सीमेवरील सैनिक मागे हटवण्यावर चीनने सहमती दर्शवली होती. पण चीनचा विश्वासघातकी चेहरा पुन्हा एकदा जगासमोर उघड झाला आहे. लडाखमध्ये एलएसीवर तणावाच्या ठिकाणांवरून (LAC) चिनी सैनिक मागे हटलेच नाही. यामुळे सीमेवरील तणावाची स्थिती कायम आहे.
भारत चीन सीमेवरील तणाव दूर करण्यासाठी गलवान खोऱ्यातील पीपी -14 आणि पीपी -15 येथूनही सैनिक मागे घेण्यात आले होते. हा पहिला टप्पा पूर्ण झाला. दोन्ही देशांचे सैनिक एक ते दीड किलोमीटर मागे हटले आणि त्या ठिकाणी बफर झोन करण्यात आला. यामुळे आमने-सामने असलेले दोन्ही देशांचे सैनिक मागे हटल्याने तणाव काहीसा कमी झाला. पण हॉट स्प्रिंग भागातून बैठकीत ठरल्या प्रमाणे चिनी सैनिक मागे हटलेले नाहीत. पॅंगॉंग भागात फिंगर -4 मधील चिनी सैनिक 9 जुलैला फिंगर -5 पर्यंत मागे गेले.
१४ जुलैच्या कोअर कमांडर स्तरावरील बैठकीनंतर फिंगर- 4 येथून चिनी सैनिक पूर्णपणे मागे हटतील असं वाटत होतं. पण चिनी सैनिक तिथून मागे हटलेले नाहीत. ते अजूनही तिथेच ठाण मांडून आहेत. सैनिक कशा प्रकारे मागे हटतील? यावर कोअर कमांडर स्तरावरील बैठकीत चर्चा झाली होती. पण प्रत्यक्षात तसं काहीच घडताना दिसत नाहीए. सैनिक मागे हटवण्यासाठी बैठकीत दोन आठवड्यांचा कालावधी निश्चित करण्यात आला होता. आता एक आठवडा उलटून गेला आहे. पहिल्या टप्प्यातही चिनी सैनिक अखेरच्या काही दिवसांमध्ये मागे हटले होते. यामुळे पुढच्या आठवड्यात चिनी सैनिक पँगाँगमधून मागे हटतील, अशी अपेक्षा लष्कराच्या एका अधिकाऱ्याने व्यक्त केली. तरीही कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी भारतीय लष्कर पूर्णपणे सज्ज आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत