संजय राऊत यांनी पुन्हा टाकला राजकीय बॉम्ब ; उडवल्या अनेकांच्या झोपा! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

संजय राऊत यांनी पुन्हा टाकला राजकीय बॉम्ब ; उडवल्या अनेकांच्या झोपा!

मुंबई : वेबटीम      महाराष्ट्राच्या राजकारणात काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या खासदार संजय राऊत यांनी आज तर मोठा राजकीय बॉम्ब टाकून भाज...

मुंबई : वेबटीम     
महाराष्ट्राच्या राजकारणात काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या खासदार संजय राऊत यांनी आज तर मोठा राजकीय बॉम्ब टाकून भाजपाबरोबरच काँग्रेस आणि राष्ट्रवादीलाही चक्रावून सोडले आहे.
आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांचा वाढदिवस आहे, त्यांना आज पहाटेपासून सोशल माध्यमाद्वारे शुभेच्छा सुरू होत्या, मंत्री महोदय, राजकीय नेते, कार्यकर्ते आदींनी ठाकरेंवर शुभेच्छांचा वर्षाव केला, यात राहुल गांधीच्या पंतप्रधान पदाचे स्वप्न पाहणारे काँग्रेस व शरद पवार यांना  पीएम पदावर पाहण्यासाठी आतुर झालेले राष्ट्रवादीचे नेतेही होतेच,  या आनंदात खासदार संजय राऊत यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या खऱ्या मात्र आपल्या नेहमीच्या शैलीत व सवयीप्रमाणे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळही उडवून दिली. खा संजय राऊत tweter वर शुभेच्छा देताना म्हणाले की,  ये दोस्ती....
हम नही तोडेंगे...
आपण आमच्या आयुष्यात खास आहात...
आपणास वाढदिवसांच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!
देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता आपल्यात आहे.. असे शेवटचे वाक्य जोडून त्यांनी पंतप्रधान पदासाठी अनेक तपे घातलेल्या या तिन्ही पक्षांच्या काही नेत्यांच्या तोंडचे जणूकाही पाणी पळविले.
खा संजय राऊत यांनी मिशन महाराष्ट्र यशस्वी करून दाखवले आहे, आता त्यांनी ठरवलं तर काहितरी उलट सुलट करून हा बाबा काहीही करू शकतो, हे सर्वच पक्षातील लोकांना माहिती आहे, शिवाय शरद पवारांच्या तालमीत तयार झालेला हा मल्ल असल्याने येणाऱ्या काळात राजकीय घडामोडी अशाच घडविण्यासाठी राऊत प्रयत्न करणार हे नक्की, त्यामुळे आज अनेकांना या शुभेच्छा झोप उडविणार्या ठरणार आहेत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत