रुग्णांना आकारलेल्या बिलाची लेखापरीक्षक करणार तपासणी ; अजित पवार - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

रुग्णांना आकारलेल्या बिलाची लेखापरीक्षक करणार तपासणी ; अजित पवार

पुणेः वेबटीम राज्यातील करोनाबाधित रुग्णांवर उपचार केल्यानंतर खासगी रुग्णालयांकडून देण्यात येणाऱ्या वैद्यकीय बिलांची स्वतंत्र लेखापरीक्ष...

पुणेः वेबटीम
राज्यातील करोनाबाधित रुग्णांवर उपचार केल्यानंतर खासगी रुग्णालयांकडून देण्यात येणाऱ्या वैद्यकीय बिलांची स्वतंत्र लेखापरीक्षकांकडून तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे रुग्णालयांनी राज्य सरकारने निश्चित केलेल्या दरांनुसारच आकारणी करावी. अन्यथा संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सोमवारी दिला.

खासगी रुग्णालयांकडून जास्त वैद्यकीय बील आकारणी करण्यात येत असल्याच्या तक्रारी येत आहेत. करोनाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत यावर चर्चा करण्यात आली. त्यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी या सूचना केल्या.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, 'खासगी रुग्णालयांकडून जास्त बील आकारणी करण्यात येत असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे खासगी रुग्णालयांनी दिलेल्या वैद्यकीय बिलांची स्वतंत्र लेखापरीक्षकांच्या माध्यमातून तपासली केली जाणार आहे. त्यामुळे रुग्णालयांनी नियमानुसारच बील आकारणी करावी. अन्यथा संबंधितांवर कारवाई केली जाईल’

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत