तु मला फार आवडतेस ; संस्था चालकाकडून महिलेचा विनयभंग - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

तु मला फार आवडतेस ; संस्था चालकाकडून महिलेचा विनयभंग

देवळाली प्रवरा : वेबटीम देवळाली प्रवरा परिसरातील एक संस्था चालकाने नाशिक येथे महिलेचा विनयभंग केल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आ...

देवळाली प्रवरा : वेबटीम
देवळाली प्रवरा परिसरातील एक संस्था चालकाने नाशिक येथे महिलेचा विनयभंग केल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक रोडवरील एक महिला घरी असताना तेथे देवळाली परिसरातील ‘तो’ संस्था चालक तेथे गेला होता. ती महिला या महोदयांना चहा आणण्यासाठी किचनमध्ये गेली असता त्यावेळी हा आरोपी मागे गेला व घरात कोणी नाही हे पाहून त्या महिलेस जवळ घेण्याचा प्रयत्न केला व छातीवर दाबून तु मला फार आवडतेस असे म्हणाला, त्यावेळी महिलेने त्याच्या हात झटकला असता राग येवून आरोपीने हाताचापटीने मारहाण करून ओरडू नये, म्हणून तोंड दाबून धरून महिलेच्या अंगाला स्पशर करून स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. अशी फिर्याद त्या महिलेने दिली असून याप्रकरणी पोलिसांनी गु. र. न. 0366/2020 प्रमाणे भा.दं. वि.कलम 354/323 प्रमाणे या संस्था चालकावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास  सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सोनवणे हे करत आहेत. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत