जिल्ह्यात 24 तासात 428 जणांना कोरोना - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

जिल्ह्यात 24 तासात 428 जणांना कोरोना

अहमदनगर : वेबटीम जिल्ह्यात गेल्या २४ तासात जिल्हा रुग्णालयाची कोरोना टेस्ट लॅब, अँटीजेन चाचण्या आणि खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल...

अहमदनगर : वेबटीम
जिल्ह्यात गेल्या २४ तासात जिल्हा रुग्णालयाची कोरोना टेस्ट लॅब, अँटीजेन चाचण्या आणि खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेले असे मिळून एकूण ४२८ रुग्णांची नोंद झाली. 
 लॅबमध्ये ८४ जणांचे अहवाल बाधित आढळले. अँटीजेन चाचणीमध्ये ४४ जण बाधित आढळले तर खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या अहवालात पॉझिटिव्ह आढळून आलेल्या आणि आयसीएमआर पोर्टलवर नोंद झालेल्या ३०० रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली.
यामुळे उपचार सुरू असलेल्या एकूण रुग्णांची संख्या आता १२८१ इतकी झाली असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या १२९१ इतकी आहे. जिल्ह्यात एकूण रुग्ण संख्या आता २६२० इतकी झाली आहे. दरम्यान, कोरोनाला घाबरू नका, पण काळजी घ्या, तसेच चुकीच्या अफवा पसरू नये, त्यामुळे समाजात गोंधळ होऊ शकतो, जे पॉझिटिव्ह आहेत, त्यांचे अहवाल येतात, तशा सूचना येतात, मात्र निगेटिव्ह असल्यास त्याबाबत खाली फारशी माहिती येत नाही, त्यामुळें सर्वांनी सामाजिक भान ठेवावे, असे आवाहन ' आवाज जनतेच्या' वतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत