राहुरी : वेबटीम। उंबरे या गावासह संपूर्ण राज्यातील अनेक लोकांना हक्काची घरे नाहीत, असे सर्व लोक केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त योजन...
राहुरी : वेबटीम।
उंबरे या गावासह संपूर्ण राज्यातील अनेक लोकांना हक्काची घरे नाहीत, असे सर्व लोक केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त योजनेतील घरकुलाची डोळ्यात प्राण आणून वाट पाहत आहेत. त्यामुळे आपण लक्ष घालूून घरकुुलाची 'ड' यादी तत्काळ मंजूर करून पात्र कुटुंबाला घर देेऊन दििवााळीची गोड भेेट द्यावी, असे साकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना छत्रपती प्रतिष्ठानने इमेलवरून घातल्यानंतर त्यांनी या अर्जाची तत्काळ दखल घेऊन संबंधित विभागाला सूचना केल्या आहेत. त्यामुळे घरकुल लाभार्थी आशा उंचावल्या आहेत.
अर्जात म्हटले आहे की, 2002-07 ची दारिद्र्य रेषेच्या यादीतील लाभार्थी कुटुंबाला लाभ मिळाला नसतानाच ती यादी अर्धवट अवस्थेत बंद केली होती, त्यामुळे दारिद्र्य रेषेत अर्थात घरकुल प्रतीक्षा यादीत नाव असतानाही अनेक कुटुंब वंचीत राहिली होती, त्यानंतर नवीन यादी मागील सरकारनेच लागू केली, त्यात वंचित नावे आली नाही, त्यामुळे गावोगावी आरडाओरडा झाला, त्यातून ' ड' यादीची संकल्पना बाहेर आली, ती यादी ग्रामसभेने तयार करण्याच्या सूचना करण्यात आल्या, गावोगावी यादी तयार झाली, मात्र ती पुन्हा रद्द करण्यात आली, त्यांनतर पुन्हा शेजारील गावाचे ग्रामसेवक यांनी सर्व्हे केला व यादी बनवून पाठवली, दुर्दैवाने ती यादीही रद्द करण्यात आली, त्यानतर पुन्हा ऑनलाइन सर्व्हे झाला, ड यादीत समावेश होणेसाठी पुन्हा अर्ज आणि अर्जदार कुटुंबाच्या घराचे फोटो व माहिती अपलोड करण्यात आली, 2017-18 पासून या यादीचा गोंधळ सुरू असताना अजूनही ठोस निर्णय झालेला नाही, गेल्या महिन्यात पुन्हा आता यादीतील कुटुंबाचे आधार ओळख पत्र डाऊनलोड करण्याचे काम घेतले आहे, त्यामुळे शासन व प्रशासनाच्या कासावगतीने सुरू असलेल्या या कामकाजाबाबत जनतेमधून तीव्र नाराजी आहे. मुख्यमंत्री साहेब, छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात आपण आज जनतेचे कैवारी आहेत, गोरगरीब जनता तुमच्याकडे मोठ्या अपेक्षेने पाहत आहेत, शेतकरी कर्जमुक्ती शब्द पाळून तुम्ही आमचा विश्वास अजून दृढ केला आहे, आता या प्रकरणीही आपण तत्परतेने सविस्तर माहिती घेऊन, तत्काळ घरकुल ' ड' यादी फायनल करावी व दिवाळी पूर्वी लाभार्थी बंधू व भगिनींना दिवाळी-ओवाळीची भेट म्हणून नव्या घरकुलाची मंजुरी द्यावी, या मागणीची दखल घेऊन वरील अर्ज मुख्यमंत्री महोदय यांनी संबंधित विभागाकडे पाठवला आहे, त्यामुळे लवकरच ड यादी अंतिम होऊन पात्र कुटुंबाला हक्काचे घरकुल मिळण्याच्या आशा उंचावल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत