श्रीरामपूर ः वेबटीम शहरात काल संध्याकाळपासून आज बुधवारी दुपारपर्यंत २६ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत . तर आज दुपारी ३९ संशयित रुग्...
श्रीरामपूर ः वेबटीम
शहरात काल संध्याकाळपासून आज बुधवारी दुपारपर्यंत २६ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत . तर आज दुपारी ३९ संशयित रुग्णांच्या रॅपिड टेस्ट दुपारी सुरू झाल्या होत्या, यात किती रुग्ण आढळतात, याकडे लक्ष लागले आहे .तालुका आरोग्य अधिकारी मोहन शिंदे यांनी याबाबत सांगितले की , काल संध्याकाळपासून आज दुपारी १ वाजेपर्यंत एकूण २६ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत . काल २२ नवे रुग्ण आढळले होते . त्यात वार्ड नं . १ मध्ये २ , वार्ड नं . २ मध्ये ३ , वार्ड नं . ४ मध्ये ४ , वार्ड नं. ६ मध्ये ४ , वार्ड नं . ७ मध्ये ३ बेलापूर गाव १ , इंदिरानगर १ दत्तनगर १ , मोरगे वस्ती १ असे २२ रुग्ण शहरात . व शहराच्या परिसरात आढळून आले . आज बुधवारीपुन्हा सकाळी ४ नवे रुग्ण सापडले आहेत . या चारही रुग्ण वार्ड नं . २ मधील आहेत . त्यामुळे श्रीरामपूर आणि तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आज बुधवारी १२८ वर गेली आहे . परवा ही संख्या १०२ वर होती . कालपासून आजपर्यंत २६ नव्या केस पुढे आल्या आहेत . आणखी संशयितांचे नाव घेण्याचे काम सुरू आहे . जवळपास ३ ९ संशयितांचे आज बुधवारी दुपारी स्राव घेवून त्यांची रॅपिड टेस्ट होणार असल्याचेही डॉ . शिंदे यांनी सांगितले . श्रीरामपूर शहर आणि परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याचे दिसत आहे . गेल्या १५ दिवसातच मोठ्या प्रमाणावर रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे . त्यामुळे विशेष दक्षता घेण्याची गरज आता निर्माण झाली आहे .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत