नगर : भारत पवार अहमदनगर विद्यालयात सर्वात जुने महाविद्यालय असून, चांगल्या शैक्षणिक सुविधा देण्यासाठी महाविद्यालयाच्यावतीने नेहमीच प...
नगर : भारत पवार
अहमदनगर विद्यालयात सर्वात जुने महाविद्यालय असून, चांगल्या शैक्षणिक सुविधा देण्यासाठी महाविद्यालयाच्यावतीने नेहमीच प्रयत्नशिल असते. यासाठी महाविद्यालयातील शिक्षकही परिश्रम घेत असतात. त्यामुळेच महाविद्यालयाच्या यशाचा आलेख उंचावत आहे. पुढील काळातही आधुनिक व दर्जेदार शिक्षण देण्यासाठी प्रयत्नशिल आहोत, असे प्रतिपादन अहमदनगर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.जे.बार्नबस यांनी केेले.
नुकत्याच जाहीर झालेल्या इ. 12 वी परिक्षेच्या निकालामध्ये अहमदनगर महाविद्यालयातील विज्ञान, वाणिज्य व कला शाखेत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा प्राचार्य डॉ.आर.जे.बार्नबस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपप्राचार्य विनीत गायकवाड उपस्थित होते.
महाविद्यालयाचा निकाल विज्ञान शाखेत : प्रथम - रोहित गुगळे (86.47%), द्वितीय - सिमरन कामपली (81.69%), तृतीय - निखिल कनोजिया (80.76%). तर वाणिज्य शाखेत : प्रथम - रशा सय्यद (83.85%), द्वितीय - ज्ञान लोहान (82.15%), चंद्रेश मेहता (82.15%),सुनयना नांबर (82.15%), तृतीय - असरर तांबोळी (81.69%) व कला शाखेत : प्रथम -कोमल भागवत (85.38), द्वितीय - गायत्री केमकर (83.08%), तृतीय - सृष्टी खोमणे (81.07) यांनी अनुक्रमे क्रमांक पटकाविला.
याप्रसंगी उपप्राचार्य विनीत गायकवाड यांनी महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी प्रयत्नशील आहे; त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांबरोबरच सामाजिक, भौतिक सुविधांकडेही लक्ष दिले जाते. त्याचबरोबर नियमांची कडक अंमलबजावणी व चांगल्या वातावरणामुळे महाविद्यालयात प्रवेश घेण्यात मुलींची संख्या वाढली आहे. प्राचार्य डॉ.आर.जे.बार्नबस यांचे मार्गदर्शन, शिक्षक व विद्यार्थ्यांच्या प्रयत्नाने महाविद्यालयाचा निकाल उत्कृष्ट असा लागला असल्याचे त्यांनी सांगितले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत