लाचलुचपत, पोलीस व आता महापालिकेत कोरोना ; आस्थापना, आरोग्य अधिकारी बाधित - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

लाचलुचपत, पोलीस व आता महापालिकेत कोरोना ; आस्थापना, आरोग्य अधिकारी बाधित

अहमदनगर : वेबटीम  लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय,  पोलीस प्रशासनात कोरोनाने शिरकाव  केला आहे. या अधिकाºयांच्या संपर्कातील लोकांची आता तपास...

अहमदनगर : वेबटीम 
लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय,  पोलीस प्रशासनात कोरोनाने शिरकाव  केला आहे. या अधिकाºयांच्या संपर्कातील लोकांची आता तपासणी सुरू असताना महापालिका नगररचना विभागातील एका अधिकाºयाला कोरोनाची लागण झाली. आता त्या पाठोपाठ आरोग्य आणि आस्थापना विभागातील एका अधिकाºयाला कोरोनाने गाठले, त्यामुळे महापालिका मुख्यालय बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 
महापालिकेतील नगररचना विभागातील एका अधिकाºयाला आधी कोरोनाची लागण झाली होती. सोमवारी आरोग्य विभागातील एका कर्मचाºयाला, तर आस्थापना विभागातील एका अधिकाºयाला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे महापालिकेतील मुख्यालयातील सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांना घरी पाठविण्यात आले आहे. त्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत महापालिका मुख्यालयातील कामकाजही बंद राहणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत