अमरनाथ यात्रेवर हल्ल्याचा कट ; 3 दहशतवाद्याना कंठस्नान - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

अमरनाथ यात्रेवर हल्ल्याचा कट ; 3 दहशतवाद्याना कंठस्नान

दिल्ली : वेबटीम    जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांच्या कारवाईत जैश-ए- महमद या संघटनेचे तीन दहशतवादी ठार झाले. या कारवाईत लष्कराचे तीन ज...

दिल्ली : वेबटीम 
 जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांच्या कारवाईत जैश-ए- महमद या संघटनेचे तीन दहशतवादी ठार झाले. या कारवाईत लष्कराचे तीन जवानही जखमी झाले. कुलगाममध्ये सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये ही चकमक झाली. जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी ही माहिती दिली.
 अमरनाथ यात्रेवर हल्ला करण्याचा या दहशतवाद्यांचा कट होता, अशी माहिती आम्हाला मिळाली होती. राष्ट्रीय महामार्ग ४४ हा संवेदनशील प्रकारात मोडतो. कारण याच मार्गावरून अमरनाथच्या दिशेने यात्रेकरू जात असतात. अमरनाथ यात्र चार दिवसांनंतर सुरू होणार आहे. या यात्रेपूर्वी दहशतवाद्यांविरोधात यशस्वीपणे कारवाई करण्यात आली आहे. यात्रा शांततेत आणि सुरक्षितपणे पूर्ण होईल, हा संदेश आम्ही नागरिकांना दिला आहे. अमरनाथ यात्रेकरूना कुठल्याही अडथळ्याशिवाय यात्रा करता येईल, असं भारतीय लष्कराचे ब्रिगेडीयर आणि सेक्टर २ चे कमांडर व्ही. एस. ठाकूर यांनी सांगितलं.   कुलगाममध्ये चकमकीत ठार झालेल्या तीन दहशतवाद्यांपैकी एकाची ओळख पटली आहे. वलीद असं त्याचं नाव असून तो पाकिस्तानी नागरिक होता. गेल्या दीड वर्षापासून तो या भागात सक्रिय होता. सुरक्षा दलांनी आतापर्यंत चार वेळा केलेल्या कारवाईत घेरा तोडून तो पळून गेला होता. मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यां पैकी होत एक होता, अशी माहिती काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी दिली. अमरनाथ यात्रा या दहशतवादी लोकांच्या रडारवर होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत