आज गुरुवार दि 16 जुलै, वाचा काय म्हणतेय तुमची रास - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

आज गुरुवार दि 16 जुलै, वाचा काय म्हणतेय तुमची रास

  मेष :  आरोग्याााकडे लक्ष द्या, बेशिस्तपणा टाळा. आजचा दिवस संमिश्र फलदायी. मुलांकडून आनंदवार्ता मिळतील. प्रलंबित कामे मार्गी लागण्यास स...

 
मेष :  आरोग्याााकडे लक्ष द्या, बेशिस्तपणा टाळा. आजचा दिवस संमिश्र फलदायी. मुलांकडून आनंदवार्ता मिळतील. प्रलंबित कामे मार्गी लागण्यास सुरुवात होईल. मान, सन्मान मिळतील.
वृषभ : मान, सन्मान, प्रतिष्ठा वृद्धिंगत होईल. धनलाभाचे योग आहेत. कार्यक्षेत्रात नवीन जबाबदारी स्वीकारावी लागेल. कौशल्याचा पूरेपूर वापर कराल. नवीन संधीचा फायदा करून घेण्यास सज्ज राहा.
मिथुन : सावध पवित्रा हवा. पोटाचे विकार त्रस्त करतील. हितशत्रूंचा त्रास संभवतो. व्यवसाय, व्यापार, उद्योगात आज जोखीम पत्करू नका. आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नका. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. 

कर्क : विनाकारण तोंडसुख नको. भावनिक विचार वा ताण नको. पराक्रमात वाढ होईल. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. दिवसाचा उत्तरार्ध मौजमजेत व आनंदात जाईल. मानसिक शांतता लाभेल. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील.
सिंह : आर्थिक बचतीचे व्यवहार निष्फळ ठरतील. खासगी समस्या सामंजस्याने सोडवाल. घरातील कामे झपाट्याने पूर्ण कराल. धनलाभ होण्याचे योग आहेत. दिवसाच्या उत्तरार्धात आनंदवार्ता मिळतील. 
कन्या : अवडत्या कामासाठी आज वेळ मिळेल. वयाने लहान असणारी व्यक्ती आज मोलाची शिकवण देईल. व्यवसाय, व्यापार, उद्योग गतीमान होतील. मनोबल वाढेल. मुले व जोडीदार शुभवार्ता देतील. मन आनंदी राहील. हितशत्रू पराभूत होतील

तुळ : घरात वादळाची स्थिती उत्पन्न होऊ शकते. संयमाने परिस्थितीवर नियंत्रण मिळवा. एकी हेच बळ हे सूत्र लक्षात ठेवा. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना उत्तम संधी प्राप्त होतील. सकारात्मक परिवर्तन घडेल. महत्त्वाची कामे प्राधान्याने पूर्ण कराल. ज्येष्ठ मंडळींचे उत्तम सहकार्य लाभेल. मित्रांकडे मन मोकळे केल्याने शांतता लाभेल.
वृश्चिक : निकष ठरवावे लागणार. कृषी क्षेत्रातील मंडळींना लाभ. शेजाऱ्यांची कामे करावी लागतील. दिनक्रम व्यस्त राहील. तणावमुक्तीचा दिवस. वादविवादात पडू नका. आहारावर नियंत्रण ठेवा. मोसमी आजार त्रस्त करण्याची शक्यता. आरोग्याची काळजी घ्यावी. रोग होण्यापेक्षा टाळलेला बरा, हे धोरण ठेवावे.
धनु : गरज समजून काम करायला हवे. घाई केल्यास तोटा. मन कलुषित होऊ देऊ नका. अनावश्यक खर्च टाळावेत. प्रवास लाभदायक ठरतील. दिवसाच्या उत्तरार्धात शुभवार्ता मिळतील. मानसिक शांतता लाभेल. दिवसभर ऊर्जा आणि उत्साह टिकून राहील. 

मकर : वाद होईल असे विषय टाळावे. अनेक अडचणींवर तोडगा सापडेल. कार्यालयीन कामे वेगाने पूर्ण कराल. अकल्पित लाभ मिळण्याची शक्यता. ज्येष्ठांच्या भेटी मानसिक प्रसन्नता प्रदान करतील. कार्यक्षेत्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. पालकांचे शुभाशिर्वाद प्राप्त होतील.

कुंभ : अवाजवी खर्च वाढतील. आज एकांत हवाहवासा वाटेल. जुन्या आठवणी दाटून येतील. उत्पन्नाच्या नव्या संधी प्राप्त होतील. हितशत्रू व विरोधक परास्त होतील. नवीन ओळखी लाभदायक ठरतील. कार्यक्षेत्रातील वातावरण अनुकूल राहील.
मीन : संततीस अभ्यासविषयक मार्गदर्शन कराल. हातात पैसा टिकणे केवळ अशक्य. मानसिक अस्थैर्य राहील. प्रलंबित येणी प्राप्त होण्याची शक्यता. एखाद्या कठीण समस्येवर मार्ग काढण्यास यश मिळेल. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत