संगमनेर : वेबटीम संगमनेर तालुक्यात गुन्हेगारी वाढत असताना आज कोल्हार - घोटी राज्यमार्गावरील चिंचपुर शिवारात सिनेस्टाईल पाठलाग कर...
संगमनेर : वेबटीम
- संगमनेर तालुक्यात गुन्हेगारी वाढत असताना आज कोल्हार - घोटी राज्यमार्गावरील चिंचपुर शिवारात सिनेस्टाईल पाठलाग करून 10 दरोडेखोरांसह दोन वाहने व घातक शस्त्रे असा सुमारे २३ लाख १७ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
या घटनेची अधिक माहिती अशी की, शनिवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास मी, पोलिस नाईक शांताराम झोडगे, आनंद वाघ, होमगार्ड अमोल सहाणे, माजी सैनिक दामोदर भोसले गस्त घालत असताना लोणी - संगमनेर रस्त्यावरील वृन्दांवन हाॅटेल समोर दोन मालवाहतूक ट्रक (एम. एच. १० ऐडब्ल्यू. ७१,) व (एम. एच. ४० बीएल ५५६९, तसेच एक पिकअप व्हॅन (एम. एच. २५ ऐजे २१४८) या वाहनामध्ये संश्ययास्पद हालचाली दिसल्याने पोलिसांनी पाठलाग करुन अरुण उर्फ बिभिषण काळे (वय - ३०, रा. कन्हेरवाडी फाटा, ता. कळंब, जि. उस्मानाबाद) व समाधान शहाजी घुमरे (रा. आदोरा, ता. कळंब, जि. उस्मानाबाद) या दोघाना पकडले. यावेळी त्याच्या वाहणाची तपासणी घेतली असता लोखंडी कटर, धारदार सुरा, लोखंडी कटावण्या, गज अशी घातक हत्यारे मिळून आली. त्यामुळे पकडलेल्या दोघाकडे पळून गेलेल्याची माहिती विचारल्यानतंर त्यानी नाना भास्कंर ऊर्फ भाषा काळे, राहुल कालिदास काळे, बाबुशा भिमराज काळे, बिभिषण राजाराम काळे, रमेश लगमन काळे, सुभाष ऊर्फ हरी ऊर्फ दादा भास्कंर काळे, चदंर ऊर्फ चदंऱ्या भास्कर काळे, सुधाकर श्रावण भगत, नवनाथ बाळू काळे व बाबू अनिल शिदें सर्व कळंब तालुक्यातील (जि. उस्मानाबाद) हे रहिवासी पळाल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी लोणी व नगर नियत्रंण कक्षाला याबाबत माहिती दिली. यानतंर इतर आरोपीचा शोध घेतला असता कोल्हार (ता. राहाता) येथून नाना भास्कंर ऊर्फ भाषा काळे, राहुल कालिदास काळे व बाबुशा भिमराज काळे यांना ताब्यात घेतले. यावेळी आरोपीना पोलीसी खाक्या दाखवताच त्यानी सोन्याच्या दुकानावर दरोडा टाकणार असल्याची माहिती पोलीसाना दिली, येथिल पोलीस नाईक सुनिल चव्हाण यांच्या पथकाने उरवर्रित पाच दरोडेखोराच्या मुसक्या आवळल्या.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत