राहुरी ः वेबटीम मुळा धरण पाणलोटात दोन दिवसांपासून पावसाचा जोर ओसरल्याने अजुनही धरणाकडे अपेक्षित विसर्ग सुरू झालेला नाही. त्यामुळे आज स...
राहुरी ः वेबटीम
मुळा धरण पाणलोटात दोन दिवसांपासून पावसाचा जोर ओसरल्याने अजुनही धरणाकडे अपेक्षित विसर्ग सुरू झालेला नाही. त्यामुळे आज सायंकाळी धरणाच्या दिशेने 1513 क्युसेकने पाणी सुरू होते. तर धरणाचा पाणीसाठा 8500 दलघफू अर्थात साडेआठ टिएमसी इतका झाला होता.मुळा धरणाकडे शेतकर्यांचे लक्ष लागले आहे. मात्र पाणलोटात पावसाने दमदार हजेरी लावलेली नसल्याने पिंपळगाव खांड भरूनही अजून अपेक्षित आवक सुरू झालेली नाही. त्यामुळे मुळा धरणाचा पाणीसाठा कासवगतीने वाढत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, उत्तर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा धरणाचा पाणीसाठा सायंकाळी 4100 तर निळवंडेचा 4200 दलघफु इतका झाला आहे. भंडारदरा पाणलोटातही उन-पावसाचा खेळ सुरू असल्याचे पहायला मिळत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत