‘या’ मुख्यमंत्र्यांनाही कोरोना ; राजकीय नेत्यांमध्ये खळबळ - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

‘या’ मुख्यमंत्र्यांनाही कोरोना ; राजकीय नेत्यांमध्ये खळबळ

दिल्ली ः वेबटीम  मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हेदेखील करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यानंतर शिवराज सिंह चौहान यांनी सोशल मी...

दिल्ली ः वेबटीम 
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हेदेखील करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यानंतर शिवराज सिंह चौहान यांनी सोशल मीडियाद्वारे नागरिकांना, छोटीशी चूकदेखील करोनाला आमंत्रण देऊ शकते, असं सांगत काळजी घेण्याचं आवाहन केलंय.
शिवराज सिंह चौहान यांनी सोशल मीडियावरून आपणं करोना पॉझिटिव्ह आढळल्याची माहिती दिली. त्यांनी लिहिलंय 'प्रिय देशवासियांनो, मला कोविड १९ ची काही लक्षणं जाणवत होती. त्यामुळे करण्यात आलेल्या टेस्टनंतर माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली. माझी सगळ्या सहकाऱ्यांना विनंती आहे की माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली करोना चाचणी करून घ्यावी आणि माझ्या निकटचा संपर्क असणाऱ्या लोकांनी स्वत:ला क्वारंटीन करावं'.
'मी करोना गाईडलाईन्सचं संपूर्ण पालन करतोय. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी स्वत:ला क्वारंटीन करून उपचार घेणार आहे. माझी राज्यातील जनतेला विनंती आहे की सावधानता बाळगा, छोटीशी चूकही करोनाला आमंत्रण देऊ शकते' असंही शिवराज सिंह यांनी म्हटलंय.
आपण २५ मार्चपासून प्रत्येक सायंकाळी करोना संक्रमणाच्या स्थितीचा आढावा घेतच राहू तसंच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून करोना समिक्षेचा प्रयत्न करेन, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हणत जनतेला आश्वासित केलंय.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत