मुळा पाणलोटात दमदार पावसाची गरज ; अजुनही आवक संतच..! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

मुळा पाणलोटात दमदार पावसाची गरज ; अजुनही आवक संतच..!

राहुरी : वेबटीम संपूर्ण जिल्हयाचे लक्ष लागलेल्या मुळा धरणाच्या पोटात संथगतीने पाणी विसावत असल्याचे पहायला मिळत आहे. आज सायंकाळीही धरणात...

राहुरी : वेबटीम
संपूर्ण जिल्हयाचे लक्ष लागलेल्या मुळा धरणाच्या पोटात संथगतीने पाणी विसावत असल्याचे पहायला मिळत आहे. आज सायंकाळीही धरणात 1161 क्युसेक इतकी आवक सुरू होती. तर धरणाचा पाणीसाठा 8600   दलघफू इतका झाला होता. 
    मुळा धरणे हे राहुरीसह नेवासा, शेवगाव व पाथर्डी तालुक्यासाठी संजीवनी देणारे वरदान समजले जाते. या धरणातील पाणीसाठ्यांवरच शेतीचे गणित अवलंबून असते. त्यामुळे मुळा धरणाकडे शेतकर्‍यांच्या चातकाप्रमाणे नजरा असतात. दरम्यान, यावर्षी अजून धरण पाणलोटात अपेक्षित पाऊस झालेला नसल्याने आवक वाढलेली नाही, परिणामी धरणात पाणी कासवगतीने येत आहे. मात्र, गेल्या वर्षीचा आढावा घेतला तर यावर्षी धरणात पाणी तीन टिएमसी जास्त असल्याने ही समाधानाची बाब आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत