उंबरे ः वेबटीम उंबरे ग्रामपंचायतीने ग्रामस्थांची घरपट्टी व पाणीपट्टी माफ करावी, यासाठी प्रभाग क्रमांक पाचमधील महिला सदस्या विमलताई स...
उंबरे ः वेबटीम
उंबरे ग्रामपंचायतीने ग्रामस्थांची घरपट्टी व पाणीपट्टी माफ करावी, यासाठी प्रभाग क्रमांक पाचमधील महिला सदस्या विमलताई सुदाम ढोकणे यांनी सहमती दर्शवली असून आता याकामी अन्य सदस्य काय भूमिका घेतात ? याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.उंबरे ग्रामपंचायतीने सध्याच्या कोरोना संकटातील लॉकडाऊन व त्यामुळे अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम लक्षात घेवून घरपट्टी व पाणीपट्टी माफ करावी, अशी मागणी छत्रपती प्रतिष्ठाणच्या वतीने करण्यात आली होती. वास्तविकतः हाच खरा ‘जनतेचा आवाज’ असल्याचे लक्षात घेवून प्रभाग क्रमांक पाचच्या विद्यमान महिला सदस्या विमलताई सुदाम ढोकणे यांनी याविषयी स्वतः पुढाकार घेत आपण गावातील लोकांची घरपट्टी व पाणीपट्टी माफ करण्याच्या निर्णयाशी सहमत आहोत. ग्रामपंचायतीने तसा ठराव करावा, त्यावर पहिली स्वाक्षरी आमची राहील, असेही विमलताई यांनी स्पष्ट केले आहे. याबाबत युवानेते गोरक्षनाथ सुदाम ढोकणे यांनी आपल्या मातोश्रींची भूमिका स्पष्ट केली आहे. आता अन्य सदस्यांच्या भूमिककडे लक्ष असून त्यांनी येत्या आठवडाभरात हा निर्णय घेतल्यास नक्कीच गावकर्यांना थोडाफार दिलासा मिळणार आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत