यंदा गणेशोत्सवासाठी सरकारची नियमावली ; वाचा काय आहेत अटी - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

यंदा गणेशोत्सवासाठी सरकारची नियमावली ; वाचा काय आहेत अटी

मुंबई ः वेबटीम : करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साधेपणानं साजरा करण्याचं आवाहन राज्य सरकारनं केलं आहे. याबाबतच्या मार्गदर्शक सू...

मुंबई ः वेबटीम
: करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साधेपणानं साजरा करण्याचं आवाहन राज्य सरकारनं केलं आहे. याबाबतच्या मार्गदर्शक सूचना सरकारनं आज जारी केल्या आहेत. त्यानुसार घरगुती गणपतीच्या मूर्तीवर दोन फुटांची मर्यादा घालण्यात आली आहे. तसंच, गर्दीमुळं होणारा संसर्ग टाळण्यासाठी विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करून घेण्याच्या सूचना गणेशभक्तांना करण्यात आल्या आहेत.
करोनाच्या पार्श्वभूमी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राज्यातील गणेशोत्सव मंडळासोबत बैठका घेतल्या होत्या. त्यात झालेल्या चर्चेनुसार राज्य सरकारनं उत्सवासाठी काही मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. त्यानुसार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्तीच्या उंचीवर चार फुटांचे तर, घरगुती मूर्तीच्या उंचीवर दोन फुटांचे बंधन असेल.

सूचना खालीलप्रमाणे:

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना आवश्यक परवानग्या घ्यावा लागतील
उत्सवाचे मंडप हे न्यायालयाचे आदेश आणि प्रशासनाच्या धोरणाशी सुसंगत असावे.  

शक्यतो घरातील धातू/संगमरवर आदी मूर्तींचे पूजन करावे. 
मूर्ती पर्यावरणपूरक असल्यास विसर्जन शक्यतो तो घरीच करावे. ते शक्य नसल्यास नजिकच्या कृत्रिम तलावात विसर्जन करावे.

गणेशमूर्तींचे विसर्जन पुढे ढकलणे शक्य असल्यास माघी गणेशोत्सव विसर्जनावेळी किंवा २०२१ च्या भाद्रपद महिन्यात पुढील विसर्जनावेळी करता येणे शक्य आहे.


सार्वजनिक उत्सवासाठी वर्गणी/देणगी स्वेच्छेने मिळत असल्यास घ्यावी. जाहिरातींच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही हे पाहावे. जाहिराती आरोग्यविषयक किंवा सामाजिक संदेश देणाऱ्या असतील हे पाहावे.


सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक सामाजिक उपक्रम किंवा रक्तदान शिबिरे घेण्यास प्राधान्य द्यावे.

आरती, भजन, कीर्तन व अन्य धार्मिक कार्यक्रम करताना गर्दी होणार नाही याची खबरदारी घ्यावी. ध्वनीप्रदूषणाच्या नियमांचे पालन करावे.

श्रीगणेशाचे दर्शन ऑनलाइन, केबल, फेसबुक व वेबसाइटद्वारे करून देण्याची व्यवस्था करावी.

गणपती मंडपामध्ये निर्जंतुकीकरण व थर्मल स्क्रिनिंगची पुरेशी व्यवस्था करावी. प्रत्यक्ष येऊन दर्शन घेणारे भाविक मास्क, सॅनिटायझर व सामाजिक अंतराचे नियम पाळतील हे पाहावे.

गणेशाचे आगमन व विसर्जनाची मिरवणूक काढण्यात येऊ नये. विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करावी.


महापालिका, विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्थांच्या मदतीनं कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात यावी

राज्य सरकारच्या संबंधित विभागांनी तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांनी घालून दिलेल्या नियमांचं पालन करणं बंधनकारक राहील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत