ग्रामपंचायतीने पाणीपट्टी व घरपट्टी माफ करावी ; छत्रपती प्रतिष्ठाणची मागणी - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

ग्रामपंचायतीने पाणीपट्टी व घरपट्टी माफ करावी ; छत्रपती प्रतिष्ठाणची मागणी

राहुरी :  वेबटीम  सध्या कोरोना संकटामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे. गावकडचे छोटे-मोठे उद्योग बंद आहेत, मजुरांच्या हाताला काम...

राहुरी :  वेबटीम
 सध्या कोरोना संकटामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे. गावकडचे छोटे-मोठे उद्योग बंद आहेत, मजुरांच्या हाताला काम नाही, शेतकर्‍यांनाही अपेक्षित उत्पन्न मिळालेले नाही, दूधधंदाही डबघाईस गेला आहे, अशा परिस्थितीत तालुक्यातील उंबरेसह सर्वच ग्रामपंचायतींनी  घरपट्टी व पाणीपट्टी माफ करून जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी उंबरे येथील छत्रपती प्रतिष्ठाणच्या वतीने करण्यात आली आहे.

आपल्या गावातील लोकं अडचणीत सापडल्यानंतर त्यांच्या मदतीसाठी आपणच धावून आले पाहिजे, याची जाणीव ठेवून सध्याच्या सत्तेतील पदाधिकार्‍यांनी प्रशासक नियुक्त करण्यापुर्वी हा ऐतिहासिक निर्णय घेवून जनतेला सुखःद धक्का द्यावा.  
राहुरी तालुक्यातील उंबरेसह सर्वच ग्रामपंचायतीअंतर्गतचे व्यवसाय, उद्योग लॉकडाऊनमुळे बंद होते. शेतमजूर, शेतकरी, दुग्धव्यवसायिक यांची अवस्थाही सर्वांनी जवळून पाहिली आहे. त्याचा परिणाम गावच्या अर्थकारणावर झाला आहे. अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशावेळी ग्रामपंचायतीने आपल्या गावातील ग्रामस्थांनी सहा महिन्यांची पाणीपट्टी व घरपट्टी माफ करून मदतीचा हात द्यावा, अशी मागणी प्रतिष्ठाणच्या वतीने लक्ष्मण पटारे, विलासराव ढोकणे, प्रा. जालिंदर दुशिंग, शरदराव वाघ, एकनाथ महाराज वाघ, सचिन शेजूळ, गणेशराव तोडमल, राहुल पाटील, गणेश दुशिंग, युवानेते गोरक्षनाथ ढोकणे, महेश ढोकणे, दीपक ढोकणे आदींनी केली आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत